पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर ‘या’ शहरात होणार कारवाई; भरावा लागणार पाच हजारांचा दंड

 



पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी चंदीगड महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. आता चंदीगड महापालिका पाण्याची नासाडी करणाऱ्यावर ५ हजार रुपयांचा दंड आकारणार आहे. ही मोहीम १५ एप्रिलपासून सुरू होणार आहे. उन्हाळा वाढल्याने चंदगडमध्ये पाणीटंचाई सुरू झाली आहे. शहरातील अनेक भागात पाणीटंचाई आहे. पाण्याच्या टंचाईमुळे, चंदीगड महापालिकेने हा निर्णय जाहीर केला आहे. चंदीगड महापालिकेने पाण्याचा अपव्यय थांबवण्यासाठी ही मोहीम सुरू केली आहे. यासाठी महामंडळाने विशेष पथके तयार केली आहेत.

चंदीगड महानगरपालिकेच्या आयुक्त अनिंदिता मित्रा यांनी सांगितले की, हे पथक पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर कडक कारवाई करेल. ज्यांनी थेट पाण्याच्या लाईनमध्ये बुस्टर पंप लावला आहे त्यांनाही दंड भरावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय जर तुमचे मीटर लिक होत असेल किंवा भूमिगत टाकी असेल, तर तुम्हाला दंड भरावे लागेल.

या लोकांवर आकारला जाणार दंड

पाणीपुरवठ्याचा पाईप लाईनवर थेट बूस्टर पंप बसवणाऱ्यांनाही दंड आकारला जाईल, हे लक्षात घेण्यासारखे आहे. एखाद्याच्या छतावर बांधलेल्या टाकीतून पाणी वाहत असल्याचे दिसल्यास त्याच्यावरही कारवाई केली जाईल.

चंदीगड प्रशासनाने म्हटले आहे की, १५ एप्रिल ते ३० जून चंदीगड, मोहाली आणि पंचकुलामध्ये सकाळी ५:३० ते ८:३० या वेळेत कोणी लॉनमध्ये पाणी टाकताना किंवा गाडी धुताना दिसल्यास त्याला पाच हजारांचा दंड ठोठावण्यात येईल. याशिवाय दंडानंतरही जर कोणी पाण्याचा अपव्यय थांबवला नाही, तर त्याचा पाणीपुरवठा खंडित करून दंडाची रक्कम पाच हजारांवरून वीस हजार करण्यात येईल, असेही प्रशासनाने म्हटले आहे. जर कोणी दंड भरला नाही, तर त्याची रक्कम त्या व्यक्तीच्या पाण्याच्या बिलात पाठवली जाईल.

एचएसव्हीपीचे कार्यकारी अभियंता अमित राठी म्हणाले की, लोकांनी सकाळी वाहने धुण्यासाठी फक्त एक बादली पाणी वापरावे. पाण्याच्या टाक्या ओव्हरफ्लो झाल्यामुळे पाण्याचा अपव्यय होणार नाही याची रहिवाशांनी काळजी घ्यावी आणि गळती होणारे पाईप्स दुरुस्त करावेत. पाण्याचे मोटर पंप वापरण्यास सक्त मनाई आहे

दरम्यान, महाराष्ट्रातील दुर्गम भागातही पाणीटंचाई असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. महाराष्ट्रातील जनतेला पाण्यासाठी किती संघर्ष करावा लागत आहे. नाशिकमध्ये पाण्यासाठी लोक विहिरींमध्ये उतरत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या