राष्ट्रवादीने भोंग्यांवरुन पुणेकरांना ऐकवली नरेंद्र मोदींची इंधन दरवाढीवरील भाषणं


 म्हणाले, “मोदींना महागाईचा…”

केंद्र सरकारकडून सतत इंधन दरवाढ केली जात आहे.यामुळे सर्व सामन्य नागरिकांचे जगणे मुश्किल झाल्याची टीका करत आज पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केलं. आज पुण्यातील गुडलक चौकात राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकीत पेट्रोल-डिझेल दरवाढी बाबत भाषण केले होते. हेच भाषण भोंगायावर लावत अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, “२०१४ मध्ये पेट्रोल ६० आणि गॅसची टाकी ४०० रुपयांच्या आसपास होती. आता हेच सात वर्षात दरवाढ होत होत पेट्रोल १२० आणि गॅस हजाराच्या घरात गेले आहे. यामुळे आता कसं जगायचे असा प्रश्न सर्व सामन्य नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.”

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी अनेक सभा घेत महागाईवर भाषणं केली आणि आता त्यांना महागाईचा विसर पडला आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही आज भोंगायावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पेट्रोल-डिझेल वरील भाषण लावून आंदोलन करीत आहोत,” अशी भूमिका जगताप यांनी मांडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या