तीन वर्षाच्या लेकीसह आईची आत्महत्या, पती-भावाला लिहिला धक्कादायक मेसेज

 


औरंगाबाद :
तीन वर्षाच्या मुलीसह स्वतः उडी मारत एक महिलेने आत्महत्या केल्याची मन हेलवणारी घटना शुक्रवारी औरंगाबादमध्ये समोर आली आहे. पूनम गणेश विसपुते (वय २४) तर शांभवी विसपुते ( वय ०३ ) असे माय-लेकीचं नाव आहे. तर उडी मारण्यापूर्वी महिलेने भावाला, पतीला पाठवलेल्या मेसेजमध्ये 'सासूबाई, पोराला आता तरी मांडीवरून खाली उतरवा आणि दुसरे लग्न करताना त्या मुलीला फसवू नका,' असे म्हटले आहे. त्यामुळे सासरच्या छळाला कंटाळून ही आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूनमचे २०१८ मध्ये नाशिक जिल्ह्यातील गणेशसोबत लग्न झाले होते. तर गणेश परराज्यातील एका खाजगी कंपनीत कामाला आहे. दरम्यान, सासरच्या छळाला कंटाळून पूनम सहा महिन्यांपूर्वी आईकडे आली होती. त्यानंतर याबाबत चर्चा करण्यासाठी शुक्रवारी पहाटे पाच वाजता गणेश व सासरची मंडळी औरंगाबादला आली. पण त्यांच्या येण्यापूर्वीच पूनमने आपली तीन वर्षांची मुलगी शंभवीला घेऊन घरातून निघून गेली. तिचा शोध घेत असतानाच तिने आपल्या मुलीसह आत्महत्या केल्याची माहिती कुटुंबियांना मिळाली.

भावाला-पतीला पाठवला मॅसेज


पूनमने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या भावाला आणि पतीला एक मॅसेज पाठवला ज्यात तिने म्हटले आहे की, "माझ्या मरणाला मी आणि मीच जबाबदार आहे. यात माझ्या सासरच्यांची चूक नाही. माहेरच्यांची नाही. भावजी, माई (लहान बहीण) लहान आहे. तिला सांभाळून घ्या. काही चुकत असेल तर माफ करा. भय्या, तुझ्याशिवाय मम्मीला कुणी नाही. तिची काळजी घे. तुझी पण काळजी घे. माझ्यानंतर शामूला कोणी नाही. त्यामुळे मी तिला सोबत घेऊन जाते. मावशी, आई, आजी मला माफ करा. 'सासूबाई, पोराला आता तरी मांडीवरून खाली उतरवा आणि दुसरे लग्न करताना त्या मुलीला फसवू नका. जगण्यासाठी पैसा लागत नाही, तर आनंद लागतो. आय एम सो सॉरी फॅमिली"

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या