पुण्यात एकाच वेळी चोरीला गेले ५२ लाख रुपये किंमतीचे ३०७ मोबाईल; चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद


पुणे  : पुण्यातील सोमवार पेठ भागातील खुराणा मोबाईल शॉपीची भिंतीला भगदाड पाडून, तब्बल ३०७ मोबाइल चोरून नेल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार पेठ परिसरातील खुराणा मोबाईल शॉपी या दुकानाला गुरुवारी मध्यरात्री दोन चोरट्यांनी भगदाड पाडले. त्यातून दोन चोर आतमध्ये शिरले आणि त्यांनी मोबाईल बॉक्समधील एक एक मोबाइल काढून बॅगमध्ये ठेवले. दुकानातील जवळपास ३०७ मोबाईल काही मिनिटांत बॅगमध्ये भरले.

चोरी केल्यावर हे दोन चोर दुकानातून बाहेर पडून एका रिक्षात बसून पुणे स्टेशनच्या दिशेने पसार झाल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. या ३०७ मोबाईलची एकूण किंमत ५२ लाख ३० हजार ४०४ रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या