शरणपूर वृद्धाश्रमात होणाऱ्या विविध कार्यक्रमासाठी जीरे कुटुंबियांच्या वतीने ध्वनिक्षेपक संच भेट


शरणपूर वृद्धाश्रमासाठी दानशूर दात्यांनी खारीचा वाटा उचलावा-पोपटराव जीरे यांचे आवाहन

 नेवासा : खडका रोडवर असलेल्या शरणपूर वृद्धाश्रमाच्या प्रांगणात होणाऱ्या विविध कार्यक्रमासाठी नेवासा येथील जीरे कुटुंबियांच्या वतीने ध्वनिक्षेपक संच भेट देण्यात आला.कै. हरिभाऊ जीरे यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले बहुजन समाजाचे नेते पोपटराव जीरे यांच्या पुढाकाराने वृद्धांना फळे वाटून हा उपक्रम राबविण्यात आला.शरणपूर वृद्धाश्रमासाठी मी आणि माझा जीरे परिवार व मित्र परिवार सतत हातभार लावत राहू दानशूर दात्यांनी खारीचा वाटा उचलावा असे आवाहन बहुजन समाजाचे नेते पोपटराव जीरे यांनी केले आहे.

शरणपूर वृद्धाश्रमाचे चालक रावसाहेब मगर यांनी स्वागत करत वृद्धाश्रम चालवत असतांना वृद्धाश्रम कमिटीचे अध्यक्ष पत्रकार बाळासाहेब देवखिळे व मार्गदर्शक पत्रकार सुधीर चव्हाण यांच्या खंबीर साथीमुळे वृद्धाश्रमासाठी दाते हे योगदान देऊन हातभार लावत असल्याचे सांगत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाची माहिती यावेळी बोलतांना दिली.

वृद्धाश्रम कमिटीचे मार्गदर्शक पत्रकार सुधीर चव्हाण म्हणाले की अनेकजण आपल्या आईवडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ येथे येऊन अन्नदानाच्या माध्यमातून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतात,लहान मुलींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्त्री जन्माचे स्वागत उपक्रम येथे राबविला जातो,महिला भगिनींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्त्री शक्तीचा सन्मान ही येथे केला जातो त्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद वृद्धाश्रमातील उपक्रमाना मिळत आहे.ध्वनिक्षेपक संच भेट दिल्याने येथे होणाऱ्या विविध कार्यक्रमांना बहर येईल अशी भावना व्यक्त करत त्यांनी जीरे कुटुंबियांना धन्यवाद दिले.

शरणपूर वृद्धाश्रमात झालेल्या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रम आयोजक पोपटराव जीरे,अशोकराव जीरे, छोटूराम जीरे,बदाम महाराज पठाडे,मुळाचे माजी संचालक जनार्दन शेळके,शिवसेना नेते गोरख भाऊ घुले,राजेंद्र काळे,युवा नेते अनिल ताके,सामाजिक कार्यकर्ते परवेझ पठाण, संजय वाघमारे,पिंटूभाऊ जीरे, बालूभाऊ जीरे,खडका गावचे सरपंच संतोष सोनकांबळे, राजेंद्र लोखंडे,सौ. सुमनबाई जीरे,सौ.पुष्पा जीरे,सौ. मोहिनी जीरे,सौ.जयश्री जीरे,संदीप सोनकांबळे,वैभव कर्डीले,महेश गरूटे, दत्तात्रय नाचन,अमोल जीरे उपस्थित होते.वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक संतोष मगर यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या