आमिर खाननेच केला लेकीचा मेकअप, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल क्या बात है!


अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी करत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा कलाकार म्हणजे मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान. आमिरला मोठ्या पडद्यावर पाहिलं की त्याची मेहनत आणि कामाप्रती त्याचं असणारं प्रेम दिसून येतं. आमिर त्याच्या कामामध्ये कितीही व्यस्त असला तरी आपल्या कुटुंबामध्येही तो तितकाच रमलेला दिसतो. आमिर त्याच्या मुलांसोबत बऱ्याचदा एकत्रित वेळ घालवताना दिसतो. त्याचे त्याच्या कुटुंबासोबतचे अनेक फोटो देखील सोशल मीडियावर आपण पाहतो.


आता चक्क आमिर आपली मुलगी आयरा खानसाठी मेकअप आर्टिस्ट बनला आहे. तुम्हालाही हे ऐकून आश्चर्य वाटेल. पण आमिरने आपल्या लेकीचा मेकअप केला आहे. आयराने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून वडिलांसोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून आमिरचं त्याच्या लेकीवर किती प्रेम आहे हे स्पष्टपणे दिसून येतं.

आयराने वडिलांसोबतचे फोटो शेअर करत पोस्टला खास कॅप्शनसुद्धा दिलं आहे. “अंदाज लावा की माझा मेकअप कोणी केला आहे? तुमचे वडिल तुमच्या जवळ येतात आणि असा दावा करतात की ते तुमचा मेकअप तुमच्यापेक्षा उत्तम पद्धतीने करू शकतात. खरंच हे अगदी योग्य होतं.” असे आयराने म्हटलं आहे.

यानिमित्ताने आमिरमधील मेकअप आर्टिस्ट त्याच्या चाहत्यांनाही पाहायला मिळाला आहे. आयराची पोस्ट पाहताच नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स देखील करण्यास सुरुवात केली. “म्हणूनच आमिर मिस्टर परफेक्शनिस्ट आहे”, “बेस्ट फादर” अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी आयराची पोस्ट पाहून केल्या आहेत. आमिरची लेक आयरा सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. वडीलांवर आपलं किती प्रेम आहे हे ती सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करताना दिसते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या