ना.गडाख पितापुत्रांना जीवे मारण्याचा कट रचणाऱ्या नीच प्रवृत्तीच्या लोकांवर कडक कारवाई करा-


नामदार शंकरराव गडाख मित्र मंडळाची मागणी


बुधवारी नेवासा शहरासह तालुका बंदचे केले आवाहन

नेवासा : राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख व त्यांचे सुपूर्त युवा नेते उदयनदादा गडाख या पितापुत्रांना जीवे मारण्याचा कट रचणाऱ्या नीच प्रवृत्तीच्या लोकांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी नामदार शंकरराव गडाख मित्र मंडळाने तहसील कार्यालय व पोलीस स्टेशनला जाऊन केली.

यावेळी बुधवारी दि.२७ एप्रिल रोजी नेवासा शहरासह तालुका बंदचे आवाहन ही यावेळी व्यापाऱ्यांसह नागरिकांना करण्यात आले.

मंत्री नामदार शंकरराव गडाख व त्यांचे सुपूर्त युवा नेते उदयनदादा गडाख यांना दोन ते तीन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर जीवे मारण्याचा कट रचणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती.या क्लिपमुळे नेवासा तालुक्यातील जनतेमध्ये संतापाची लाट पसरली होती.विविध स्तरावर याबाबत निषेध ही नोंदविण्यात आला होता.मंगळवारी दि.२६ एप्रिल रोजी नामदार शंकरराव गडाख मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांसह सर्वधर्मीय नागरिक एकत्रित आले त्यांनी जीवे मारण्याच्या

कटाचा त्रिव निषेध करून बुधवारी दि.२७ एप्रिल रोजी नेवासा शहरासह तालुका बंद करण्याची हाक दिली. याबाबत सर्वांचा एकमुखी निर्णय झाला.नेवासा शहर व परिसरात रिक्षा फिरवून बुधवारी नेवासा शहरासह तालुका बंद असल्याचे जाहीर करण्यात आले.

मंगळवारी दि.२६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास श्री खोलेश्वर गणपती मंदिराजवळ असलेल्या नामदार शंकरराव गडाख यांच्या संपर्क कार्यालयासमोर सर्व कार्यकर्ते व सर्वधर्मीय नागरिक जमा झाले त्यांनी तेथून तहसील कार्यालयापर्यंत मुकमोर्चाने पायी जाऊन वरील घटनेचा निषेध नोंदवला तहसीलदार रुपेश सुराणा व पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांना भेटून निवेदन देण्यात येऊन जीवे मारण्याचा कट रचणाऱ्या नीच प्रवृत्तीच्या लोकांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी केली.

निवेदन देतेवेळी पंचायत समितीचे उपसभापती किशोर जोजार, शिवसेनेचे नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील,विद्यमान उपनगराध्यक्ष लक्ष्मणमामा जगताप,सतीश पिंपळे,भाऊसाहेब वाघ, राजेंद्र उंदरे,महेश मापारी,नितीन मिरपगार,अनिल मारकळी, मौलाना अबुल कलाम आझाद सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष जाकीरभाई शेख,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष गफुरभाई बागवान, नारायण लोखंडे,अंबादास ईरले,बाळासाहेब कोकणे, सुनील धायजे,इम्रान दारुवाले, पंकज जेधे,नगरसेवक दिनेश व्यवहारे,मुळाचे संचालक निलेश पाटील,अभिजीत मापारी,संजय मारकळी, उमाकांत जामदार, विनायक नळकांडे,अँड.मयूर वाखुरे, सुलेमान मनियार, दिगंबर लष्करे,राहुल सूर्यवंशी, गणेश कोरेकर,राहुल देहाडराय, प्रकाश सोनटक्के,संदीप धोंगडे, भूषण शिंदे,अमोल मारकळी,महेश कोकणे,विशाल सुरडे,तुषार जायगुडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या