जागतिक बँकेचे श्रीलंकेला मदतीचे आश्वासन

 



कोलंबो, वॉशिंग्टन :
जागतिक बँक श्रीलंकेला तातडीची मदत करणार आहे. श्रीलंकेतील अभूतपूर्व आर्थिक संकटामुळे या देशाच्या नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बुधवारी एका बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही श्रीलंकेस सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिल्याचे वृत्त आहे.

जागतिक बँकेचे उपाध्यक्ष हार्टविग श्खाफर यांनी श्रीलंकेच अर्थमंत्री अली साबरी यांच्याशी मंगळवारी वॉिशग्टन येथे चर्चा केल्याचे वृत्त बुधवारी ‘कोलंबो गॅझेट’ने दिले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या वार्षिक बैठकीसाठी साबरी अमेरिका दौऱ्यावर आले आहेत. श्खाफर यांनी सांगितले, की श्रीलंकेतील आर्थिक संकटावर मात करण्यासाठी कोणते उपाय करायचे, येथे आर्थिक स्थैर्य कसे आणायचे, गंगाजळी कशी वाढवायची आणि संकटग्रस्त नागरिकांना कशी मदत करायची, यावर आम्ही चर्चा केली. श्रीलंकेतील गरीब नागरिकांना याचा मोठा फटका बसला आहे. त्यांच्याविषयी जागतिक बँकेला फार चिंता वाटते. औषधे, वैद्यकीय साहित्य,  अन्नपदार्थ व शैक्षणिक मदतीसाठी जागतिक बँक तयार आहे.

यावेळी श्रीलंकेच्या अर्थमंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीसह भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशीही सोमवारी वॉिशग्टनमध्ये चर्चा केली. श्रीलंकेतील सध्याच्या आर्थिक स्थितीवर मात करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी आधीच उचललेल्या पावलांचे नाणेनिधीने कौतुक केल्याचे व श्रीलंकेला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही दिल्याचेही वृत्तात म्हटले आहे.

दडपशाहीचा जगभरात निषेध

श्रीलंकेतील रामबुक्काना येथे झालेल्या िहसाचारामुळे आपल्याला दु:ख झाले असल्याचे देशाचे अडचणीत आलेले अध्यक्ष गोताबया राजपक्षे व पंतप्रधान महिंदू राजपक्षे यांनी बुधवारी सांगितले. या िहसाचारात १ जण ठार तर १३ जण जखमी झाले होते.  संयुक्त राष्ट्रे, अमेरिका व ब्रिटनसह जागतिक समुदायाने नि:शस्त्र आंदोलकांवरील पोलीस कारवाईचा निषेध केल्यानंतर व चौकशीची मागणी केल्यानंतर या दोन उच्चपदस्थांनी त्यांची प्रतिक्रिया नोंदवली. दरम्यान  श्रीलंकेतील आणखी ३ खासदारांनी सरकारला दिलेला पािठबा काढून घेतल्यामुळे, राजीनामा देण्यासाठी दबाव असलेले देशाचे अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांना बुधवारी आणखी एक धक्का बसला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या