माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा ताबा सीबीआयकडे

 



आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा ताबा सीबीआयकडे देण्यात आला आहे. सीबीआयच्या टीमने मुंबईतील आर्थर रोड तुरुंग जाऊन देशमुख यांचा ताबा घेतला आहे. अनिल देशमुखांचा ताबा सीबीआयकडे गेल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.


राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केला होता. सचिन वाझे आणि पोलीस दलातील इतर दोघांना देशमुख यांनी १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते, असं सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवलेल्या पत्रात म्हटलं होतं. आर्थिक गैरव्यवहारामुळे या प्रकरणाचा तपास सक्त वसुली संचालनालयाने सुरू केला होता.

दरम्यान, आता अनिल देशमुखांचा ताबा सीबीआयने घेतला असून त्यांची पुढील चौकशी सीबीआयकडून केली जाणार आहे. तर, दोन दिवसांपूर्वी अनिल देशमुख तुरुंगात पडले होते, त्यामुळे त्यांच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतर देशमुखांवर जे जे रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या