‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यावर बलात्काराचा आरोप


लोकप्रिय मल्याळम अभिनेता विजय बाबूवर बलात्काराचा आरोप लावण्यात आला आहे. चित्रपटांमध्ये काम देण्याच्या आमिषाने महिलेसोबत शारीरिक संबंध बनवल्याचा आरोप विजयवर लावण्यात आला आहे. ही बातमी समोर येताच सर्वानांच धक्का बसला आहे.

वियज हा अभिनेत्यासोबतच एक निर्माता आणि उद्योजकसुद्धा आहे. परंतु या अभिनेत्याबद्दल अशी माहिती समोर येताच मनोरंजनसृष्टी हादरुन गेली आहे. कोडीझोड भागात राहणाऱ्या पीडित महिलेने विजय बाबूविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. या महिलेने तक्रार करत म्हटलं आहे, “चित्रपटांमध्ये काम देण्याच्या आमिषाने शारीरिक शोषण करण्यात आलं आहे”. ही माहिती समोर आली आहे.

या पिडीत महिलेने आपल्या तक्रारीमध्ये सांगितलं की, ‘कोचीत असलेल्या तिच्या फ्लॅटवर या अभिनेत्याने कामाचं आमिष दाखवून तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेवले आहेत. दरम्यान २२ एप्रिल रोजी या अभिनेत्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली आहे.”

परंतु अद्यापही पोलिसांनी या प्रकरणात अभिनेत्याची चौकशी केलेली नाही. विजय बाबूविरुद्ध बलात्कार आणि गंभीर प्रकारे शारीरिक इजा पोहोचवल्याची तक्रार नोंद करण्यात आली आहे.

या अभिनेत्याचं ‘फ्राईडे फिल्म’ नावाचं प्रोडक्शन हाऊस आहे. विजय बाबूने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सोबतच अनेक चित्रपटांची निर्मितीदेखील केली आहे. या घटनेने मल्याळम चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या