“कपाळावर टिकली का नाही?”, करीनाने हिंदूच्या सणांचा अपमान केल्याचा नेटकऱ्यांचा आरोप


बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर खान ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. करीना बऱ्याच जाहिरांतीमध्ये दिसते. सध्या करीना ‘मलबार गोल्ड अँड डायमंड्स’ च्या जाहिरातीमुळे चर्चेत आली आहे. हे एक प्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड आहे. या जाहिरातीमध्ये करीनाने कपाळावर टिकली लावली नाही म्हणून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. इतकच काय तर  आणि  हे हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसत आहेत.

पुढच्या महिन्यात अक्षय तृतीया हा सण येणार आहे. अक्षय तृतीया हा हिंदूंसाठी पवित्र सण आहे. या सणानिमित्त हिंदू दागिन्यांची खरेदी करताना दिसतात. याच निमित्ताने करीनाची ही नवी दागिन्यांची जाहिरात प्रदर्शित करण्यात आली. पण ही जाहिरात पाहिल्यानंतर अनेकांना आक्षेप घेतला आहे. या जाहिरातीच्या माध्यामातून अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्याचे देखील म्हटले जात आहे.

करीनाची ही दागिन्याची जाहिरात अक्षय तृतीयेसाठी असून तिनं या फोटोत टिकली लावली नाही, हिंदू धर्मात सणाच्या जाहिरातीत टिकली लावायाला हवी, असं अनेकांनी म्हटलं आहे. त्यामुळं करीनाच्या या जाहिरातीवर बंदी घालावी, अशी मागणी देखील केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या