अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा बडगा

 औरंगाबाद -
शहरात अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध शहर पोलिसांनी गेल्या चार दिवसांपासून धडक कारवाई सुरू केली आहे. शहरातील विविध भागात ११ एप्रिल रोजी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेने २३ गुन्हे दाखल करून ७०९ देशी-विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या.


सिडको पोलिसांनी टीव्ही सेंटर भागातून शेख मसूद शेख इसाक (वय ५५, रा. रोजेबाग) याला पकडले. त्याच्या ताब्यातून ४४ देशी बाटल्या जप्त केल्या. तसेच, संजय गांधी मार्केटमधून सुमीत शेषनारायण जैस्वाल (२२, रा. पुंडलिकनगर) याच्याकडून २१ देशी दारूच्या बाटल्या, मिसारवाडीतून सुनील लक्ष्मण वाघमारे (४०, रा. अमीना मस्जिदजवळ) याच्याकडून १९ देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. गुन्हे शाखेने ठाकरेनगर येथून सोमीनाथ नाथा डुकळे (५२, रा. बजरंगनगर) याच्याकडून १९ देशी दारूच्या बाटल्या, विमानतळाच्या भिंतीलगत आकाश महेंद्र चव्हाण (२५, रा. संजयनगर, मुकुंदवाडी) याला पकडून त्याच्याकडून देशी दारूच्या २५ बाटल्या, बजरंगनगरातून भरत आनंद रोकडे (३४) याच्याकडून देशीच्या ४३ बाटल्या, कामगार चौकातून अंशुमन चांदमल जैन (२२, रा. अंबिकानगर), सातारा स्मशानभूमीजवळून दत्ता जनार्धन बिडगर (३२, रा. सातारा गाव) याच्याकडून देशीच्या ४१ बाटल्या, भीमनगर भावसिंगपुरा येथून नारायण दशरथ देवकर (२५) याच्याकडून देशीच्या २७ बाटल्या जप्त केल्या. मुकुंदवाडी पोलिसांनी भाजी मार्केटमधून फकीरचंद बंडू साळवे (३९, रा. मुकुंदवाडी) याच्याकडून देशीच्या १२ बाटल्या, मुकुंदनगरातून देविदास अण्णा वाघ (३३, रा. रेल्वे गेट क्र. ५६) याच्याकडून देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या. बेगमपुरा पोलिसांनी घाटी क्वार्टर भागातून ममता विजय भालेराव (२३, रा. घाटी क्वार्टर) हिच्याकडून देशीच्या २८ बाटल्या जप्त केल्या. जिन्सी पोलिसांनी रवींद्रनगरातून मोहम्मद इम्तियाज उर्फ बबलू महंमद युसूफ (३२, रा शाह बाजार) याच्याकडून देशीच्या १० बाटल्या. सातारा पोलिसांनी रिता भाऊसाहेब पिंपळे (४२, रा. पाटोदा) याच्याकडून देशीच्या १५ बाटल्या, म्हाडा कॉलनी, सातारा येथून लक्ष्मण विश्वंभर राऊत (३१, रा. लक्ष्मी कॉलनी, नाईक यांच्या घरात किरायाने) याच्याकडून देशीच्या १० बाटल्या, उस्मानपुरा पोलिसांनी पवन गॅस जवळून सिद्धार्थ रमेश गायकवाड (३४, रा. कबिरनगर) विदेशी दारूच्या २२ वाटल्या, भीमनगर भावसिंगपुरा येथून राजूमुरली वाघमारे (३५) याच्याकडून देशीच्या १४ बाटल्या, सिटी चौक पोलिसानी रोज गार्डन येथून रवी पुंजाराम जाधव (३०, रा. शताब्दीनगर) याच्याकडून देशीच्या १२ बाटल्या, एमआयडीसी सिडको पोलिसांनी सावित्रीनगर येथून कचरू सोनाजी शिंदे (४०) याच्याकडून देशीच्या १४ बाटल्या, हीनानगर येथून यशोदाबाई झगडू चव्हाण (वय ५२) हिच्याकडून देशीच्या १७ बाटल्या, जवाहरनगर पोलिसांनी सय्यद जफर सय्यद गुलाब (३२, रा. इंदिरानगर, गारखेडा) याच्याकडून १५ देशीच्या बाटल्या, हर्सूल पोलिसांनी न्यू हायस्कुलच्या बाजूला प्रवीण जनार्धन थोरात (३०, रा. पळशी) याच्याकडून देशीच्या १२ बाटल्या, चेतनानगर येथून अजित अण्णाराव जाधव (३४, रा. भीमनगर भावसिंगपुरा) याच्याकडून देशीच्या २० बाटल्या जप्त केल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या