“रशियाने फक्त पाच दिवसांची मुदत…”; युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी रात्री उशिरा साधला देशवासियांशी संवाद

 
रशियाने आपल्याला फक्त पाच दिवस दिलेले असतानाही आपण ५० दिवसांनंतरही आपण टिकून आहोत याबद्दल तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे असं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी देशवासियांना म्हटलं आहे. झेलेन्स्की यांनी रात्री उशिरा देशवासियांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी २४ फेब्रुवारीला रशियाविरोधात लढण्याचा निर्णय घेणाऱ्या युक्रेनच्या करोडो नागरिकांची ही उपलब्धी असल्याचं सांगत त्यांचं कौतुक केलं.


झेलेन्स्की यांनी आपल्या भाषणात रशियन सैन्याला रोखण्यासाठी देशातील नागिरकांनी अनेक मार्गांनी मदत केल्या सांगितलं. रशियन युद्धनौका समुद्राच्या तळाशी असल्या तरी त्यांना आपण माघारी पाठवू शकतो हेदेखील दाखवून दिलंत असं ते म्हणाले. रशियन क्षेपणास्त्र क्रूझर मॉस्क्वा बंदरात नेत असताना बुडालं होतं. याचाच संदर्भ देत ते बोलत होते.

झेलेन्स्की यांनी यावेळी युद्धाचा पहिला दिवस कसा होता याची आठवण ताजी करत म्हटलं की, “अनेक देशाच्या नेत्यांना युक्रेन टिकेल की नाही याबद्दल खात्री नव्हती. अनेकांनी मला देश सोडून जाण्याचा सल्ला दिला होता. पण त्यांना युक्रेनियन्स किती शूर आहेत हे माहिती नाही. तसंच आपण स्वातंत्र्याला किती हवं तसं जगण्याला किती महत्त्व देतो याची कल्पना नाही”.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या