राज ठाकरेंची बाळासाहेबांसोबत तुलना करण्यास नारायण राणेंचा नकार; म्हणाले “साहेब म्हणजे हिंदुत्वाचा…”


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोग्यासंबंधी घेतलेल्या भूमिकेला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी समर्थन दिलं आहे. राज ठाकरेंनी मांडलेल्या भूमिकेबद्दल मी ट्वीट केलं असून त्यांचं समर्थन केलं आहे. भोंग्याला विरोध नाही, पण बेकायदेशीर भोंग्यांबद्दल ते बोलले आहेत. मग ते अनधिकृत भोंगे का ठेवावेत? अशी विचारणा नारायण राणे यांनी एबीपी माझाशी बोलताना केली आहे. राज ठाकरे कायदेशीर बोलले असून राज्य सरकारला पावलं उचलावी लागतील असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

मनसे आणि भाजपाची ताकद एकत्र आली तर ताकद वाढेल. पण भाजपा एकटी तिन्ही पक्षांना सामोरं जाण्यासाठी समर्थ आहे असं नारायण राणे म्हणाले. राज ठाकरेंच्या हिंदुत्वावर शंका येईल असं काही नाही असंही नारायण राणे यांनी सांगितलं.

लवंड्यांना..”


भोंग्यांबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय; पोलीस प्रमुखांना दिले आदेश; म्हणाले “कोणीही असो…”

“एका मुस्लीम पत्रकाराने बाळा नांदगावकरांना सांगितलं की…”, राज ठाकरेंनी भोंग्याला विरोध करताना दिलं ‘हे’ उदाहरण

शरद पवार आणि राज ठाकरेंमध्ये बाबासाहेब पुरंदरेंवरुन वाद सुरु असतानाच लेखक जेम्स लेनने केलं भाष्य; म्हणाले “पुरंदरेंनी मला…”

“राज ठाकरे कायदेशीर बोलले असून राज्य सरकारला पावलं उचलावी लागतील. कायद्याचं राज्य आहे असं दाखवण्यासाठी अधिकारी दोन तीन ठिकाणी कारवाई करतील. पण भोंगे काढल्यानंतर जो काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल ती परिस्थिती हाताळण्याची क्षमता महाराष्ट्र पोलिसांमध्ये नाही,” असं नारायण राणे म्हणाले.


“आमचं अनधिकृत घर दिसतं पण भोंग्यावर कारवाई करण्याची हिंमत नाही. राज्य सध्या दिवाळखोरीत गेलं असून विकासाच्या बाबतीत १० वर्ष मागे गेलं आहे. राज्याची आर्थिक स्थिती दयनीय आहे. विकास कऱण्यासाठी पैसे नाहीत,” असं नारायण राणे यावेळी म्हणाले.


विरोधी पक्षात असताना हेच मुख्यमंत्री शेतकऱ्यांना ५० हजार देण्याची मागणी कऱणारे आता का देत नाहीत? आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याची ताकदही यांच्यात नाही असंही ते म्हणाले. नारायण राणे यांनी यावेळी राज्याला मुख्यमंत्री कुठे आहे? अशी विचारणा केली. राज्याला मुख्यमंत्री नाही, कायदा सुव्यवस्था राहिलेलं नाही असंही ते म्हणाले.


दंगलींमुळे देशात उद्भवलेल्या स्थितीवर बोलताना ते म्हणाले की, “देशात आम्ही समर्थ आहोत. आमचे पंतप्रधान, गृहमंत्री सक्षम आहेत. डोळे बंद करुन ते फिरत नाहीत. आणि यांना वर्षा ते मंत्रालय जायला जमत नाही. तीन पक्षात मुख्यमंत्र्यांच्या लायकीचा, गुणवत्तेचा माणूस नाही का जे यांना बसवंल आहे. राष्ट्रवादी आनंदी आनंद आहे. राज्य दिवाळखोरीत चाललं आहे, सुरक्षित नाही, उद्योग येत नाहीत याची चिंता कोणाला नाही”.


राज ठाकरेंची बाळासाहेबांशी तुलना करु शकत नाही असंही नारायण राणे यावेळी म्हणाले. “बाळासाहेबांची तुलना कोणाशीही करु इच्छित नाही. साहेब म्हणजे हिंदुत्वाचा पेटता निखारा होता. त्यांनी कधीच तडजोडी केल्या नाहीत, सौदेबाजी केली नाही. सत्तेसाठी किंवा पैशासाठी हिंदुत्वाशी गद्दारीचा विचारही डोक्यात आला नाही. आतासारखे नाही….एक मुख्यमंत्रीपदासाठी हिंदुत्ववादी पक्षाला सोडलं. बाळासाहेबांनी कधीही विचार केला नव्हता”.


“केसेस टाकल्यावर दबतील असं त्यांना वाटत आहे. आम्ही पण उद्या अनेक गोष्टींवर केसेस टाकू शकतो. पण आम्ही रडी गेम खेळत नाही. आम्ही मैदानात लढणारे आहोत. तेव्हा आम्ही होतो म्हणून शिवसेना इथपर्यंत आली. पण आता सैनिकांना पदाधिकाऱ्यांना कोण विचारत आहे? मराठी तरुणांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत यासाठी आंदोलनं केली. पण दोन वर्षात किती तरुणांना नोकऱ्या मिळाल्या, उपक्रम रावबले. या सरकारकडून अपेक्षा नाही,” अशी टीका नारायण राणे यांनी केली.


“मला या सरकारची चिंता वाटते. महाराष्ट्रात उद्या दंगली भडकल्या तर आवरण्याची ताकद यांच्यात नाही. सगळे भ्रष्टाचाराने माखले आहेत,” असा आरोप नारायण राणे यांनी केला.


राष्ट्रपती राजवट लागेल असं वाटतं का विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “केंद्र सरकारला आत्ताचं सरकार कारभार सांभाळण्यासाठी, कायदा सुव्यवस्था हाताळण्यासाठी अपय़शी ठरलं असं वाटलं तर निर्णय घ्यावा लागेल. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यपाल रिपोर्ट देतील त्यावर अवलंबून असतं”. गृहखातं सांभाळण्यास दिलीप वळसे पाटील सक्षम नाहीत असं राणेंनी यावेळी सांगितलं. संजय राऊतांचा तोल गेला आहे. ईडीची कावाई झाल्यानंतर मानसिक संतुलन बिघडलं आहे असा टोला नाराणय राणे यांनी लगावला.


शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यावर टीका करताना ते म्हणाले की, “हिंदू धर्माबद्दल इतकं असतं तर आज हे राष्ट्रवादीसोबत दिसले नसते. पिकनिक काढत आहेत. हा देखावा आहे. हे हिंदूप्रेम बेगडी, स्वार्थी आहे. बाळासाहेबांना धर्माबद्दल जो गर्व होता त्यातील एक टक्काही यांच्यात नाही”.

.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या