भटक्या कुत्र्यांनी लावले दोन गटात भांडणे


वाकडी :
हल्लीच्या काळात निवडणूक, वाढदीवस, विविध थोर पुरुष यांची जयंती, विविध उद्धघाटन, यासाठी फ्लेक्स बोर्डचा वापर खूप मोठया प्रमाणात वाढत चालला आहे. अश्यातच हे बोर्ड लावताना बहुतेक ठिकाणी नियम पायदळी तूडउन या बोर्डची उंची, लांबी रुंदी व बोर्ड लावण्याचे ठिकाण या गोष्टीचा कोणीही विचार न करता बोर्ड लावतात. त्यामुळे बहुतेक ठिकाणी अश्या बोर्डची मध्यरात्रीच्या सुमारास विविध कारणांमुळे छेडछाड होऊन वादविवाद निर्माण होऊन परिणामी गुन्हे दाखल होईपर्यंत प्रकार घडतात. मात्र ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरात हे प्रकार कैद होतात त्यात बोर्डची छेडछड कोणी केली व बोर्ड कोणी फाडला हे स्पष्ट समजताच निर्माण झालेला मोठा तणाव संपुष्टात येऊन एकमेकावरचे गैरसमज दूर होतात.

असाच प्रकार श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावात घडला असून या गावात खंडाळा सहकारी सोसायटीची निवडणूक प्रक्रिया व प्रचार सुरू आहे, या निवडणुकीत दोन पॅनल आहे.या दरम्यान मंगळवार 26 एप्रिल रोजी सकाळी गावातील प्राथमिक शाळेलगत एका पॅनलचा असलेला प्रचार फलक काही नागरिकांना फाटलेल्या अवस्थेत आढळून आल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता मात्र यावेळी खंडाळा ग्रामपंचायतचे माजी सरपंच दिनकरराव सदाफळ यांनी सदरील प्रकार सीसीटीव्हीमध्ये पाहू अशी सूचना केल्यावर याच ठिकाणी खंडाळा ग्रामपंचायतमार्फत बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेत हा फलक कोणी व्यक्तीने नाही तर भटक्या कुत्र्यांनी फाडलेला आढळून आल्याने विकोपाला गेलेला वाद काही क्षनात शमला.

आज सीसीटीव्ही यंत्रणा ही गावच्या शहराच्या दृष्टीने महत्वाची ठरलेली आहे मध्यरात्रीच्या सुमारास होणारे गुन्हे, चोरी, अपघात, व विवीध अनुचित प्रकार शोधण्यास व थाबविण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा फार उपयुक्त आहे. खंडाळा गावात मध्यरात्रीच्या सुमारास भटक्या कुत्र्यांनी एका बोर्डची केलेली नासधूस ही सीसीटीव्ही मुळे स्पष्ट झाली मात्र हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला नसता तर मोठा गैरसमज निर्माण होऊन तणाव देखील निर्माण होऊन वाद विकोपाला गेले असते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या