नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टाचा झटका


तातडीने सुनावणीस तयारी दर्शवल्यानंतर आता हस्तक्षेप करण्यास नकार

आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने केलेल्या अटकेला आव्हान देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टाने झटका दिला आहे. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. महत्वाचं म्हणजे नवाब मलिक यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची तयारी सुप्रीम कोर्टाने दर्शवली होती. मलिक यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिबल यांच्या युक्तिवादाची नोंद घेऊन सरन्यायाधीश एन.व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केलं होतं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या