आयपीएल’साठी प्रेक्षकसंख्येत ५० टक्क्यांपर्यंत वाढ


मुंबई :
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या प्रेक्षकसंख्येत ६ एप्रिलपासून ५० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती तिकीटविक्री भागीदार ‘बुक माय शो’ने शुक्रवारी दिली. वानखेडे स्टेडियम, ब्रेबॉर्न स्टेडियम, डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे स्टेडियम या चार ठिकाणी होत असलेल्या ‘आयपीएल’ सामन्यांसाठी महाराष्ट्र शासनाने याआधी २५ टक्के प्रेक्षकांना परवानगी दिली होती.


‘‘स्टेडियममधील प्रेक्षकसंख्येत आधीच्या २५ टक्क्यांऐवजी ५० टक्के वाढ करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतला आहे. त्यामुळे अनेक चाहत्यांना स्टेडियममध्ये उपस्थित राहून सामन्यांचा आनंद लुटता येणार आहे,’’ असे ‘बुक माय शो’ने म्हटले आहे. राज्यातील करोनाविषयक सर्वच निर्बंध २ एप्रिलपासून उठवण्याचा निर्णय गुरुवारी महाराष्ट्र सरकारने घेतला. या पार्श्वभूमीवर ‘आयपीएल’ सामन्यांसाठी प्रेक्षकसंख्येत वाढ अपेक्षित होती.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या