पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली LCB ने दरोडेखोर पकडला; ९.१२लाखाचे दागिने जप्त…


श्रीरामपूर : श्रीरामपूर, शिर्डी, नेवासा, पाथर्डी, सोनई, जामखेड, एमआयडीसी परिसरातील दरोडा, जबरी चोरी करणारा सुत्रधाराकडुन एकुण ०८ गुन्ह्यातील ९,१२,०००/- (नऊ लाख बारा हजार रु. किचे) रु.कि.चे १७२ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत व मोक्का गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी दादासाहेब ज्ञानदेव मरकड, वय ४०, रा. खंडाळा, ता. श्रीरामपूर यांचे घराचा दरवाजा तोडुन, घरात प्रवेश करुन, कपाटातील सामानाची उचका पाचक करुन, घरातील पेट्या घराचे बाहेर घेवून जावुन १,९९,३५०/- रु.कि.चे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल बळजबरीने चोरुन घेवुन गेले. सदर घटने बाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. ६३/२०२२ भादविक ३९४, ४५९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर घटना घडल्यानंतर मा. श्री. मनोज पाटील साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी पोनि/ श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना अशा प्रकारचे गुन्हे करणारे आरोपींची माहिती घेवून ना उघड गुन्हे उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते.

 नमुद आदेशान्वये पोनि / श्री. अनिल कटके, स्थागुशा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथकाची नेमणुक करुन सपोनि /सोमनाथ दिवटे, पोसई / सोपान गोरे, पोहेकॉ/सुनिल चव्हाण, दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी, भाऊसाहेब कुरुंद, दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, संदीप पवार, पोना / ज्ञानेश्वर शिंदे, शंकर चौधरी, संदीप दरदंले, सचिन आडबल, विशाल दळवी, लक्षमण खोकले, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, पोकॉ/रणजीत जाधव, रविंद्र घुंगासे, जालिंदर माने, सागर ससाणे, मेघराज कोल्हे, योगेश सातपुते, रोहित येमुल, मयुर गायकवाड, विजय घनेघर, मच्छिद्र बर्डे, विनोद मासाळकर, चापोहेकॉ/ उमाकांत गावडे व चापोना/भरत बुधवंत यांना सुचना व मार्गदर्शन करुन कारवाई करणे बाबत आदेशीत दिले होते.


नमुद पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार नेवासा शहर व परिसरात पेट्रोलिंग करत असतांना पोनि/श्री. अनिल कटके यांना गुप्त बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, आरोपी नामे सचिन भोसले हा त्याचे साथीदारासह नेवासा येथे चोरी केलेले सोन्याचे दागिने मोडण्यासाठी घेवुन येणार आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. कटके यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या माहिती पथकास कळविली. माहिती प्राप्त होताच पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सलाबतपुर, ता. नेवासा या परिसरातून आरोपीचे ठावठिकाणा बाबत माहिती घेवून सदर आरोपी हा नेवासा येथे चोरी केलेले सोने विकण्यासाठी खडकाफाटा मार्गे नेवाशाकडे एक काळे रंगाचे मोटार सायकलवर त्याचे दोन साथीदारासह येणार आहे. अशी खात्री होताच पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी खडकाफाटा, ता. नेवासा येथे सापळा लावला, थोडयाच वेळात मिळालेल्या माहिती नुसार सलाबतपुर कडुन खडकाफाट्याकडे एका काळ्या रंगाचे मोटार सायकलवर अज्ञात तीन इसम येतांना पथकास दिसले. पोलीस पथकाची खात्री होताच त्यांना थांबण्याचा इशारा करताच त्यांनी मोटार सायकल जोरात चालवुन नेवासा फाट्याच्या दिशेने जोरात जाव ताच मोटार सायकलवर पाठीमागे बसलेल्या इसमास कॉलरला पकडुन धरुन ठेवले त्याच वेळी मोटार सायकलवरील पुढे बसलेले दोन इसम मोटार सायकल जोरात चालवुन नेवासा फाट्याच्या दिशेने पळुन गेले त्यांचा पाठलाग केला परंतु ते मिळुन आले नाही. ताब्यात घेतलेल्या आरोपीस त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने सुरुवातीस तो उडवाउडवीची उत्तरे देवुन लागला त्यास अधिक विश्वासात घेवुन चौकशी करता त्याने त्याचे नाव व पत्ता १) सचिन सुरेश भोसले वय २३, रा सलाबतपुर, ता. नेवासा असे असल्याचे सांगीतले. तसेच पळून गेलेल्या इसमांबाबत त्याचेकडे विचारणा केली असता त्याने त्यांची नावे १) असिफ नासिर शेख रा. वांळुज, जिल्हा औरंगाबाद, २) गुलब्या शिवाजी भोसले रा. गोंडेगांव, ता. नेवासा असे असल्याचे सांगितले.


 ताब्यात घेतलेल्या आरोपी सचिन सुरेश भोसले यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे अंग काडतीमध्ये एका पांढ-या गोणीच्या पिशवीमध्ये विविध प्रकारचे ९,१२,०००/- रु. किचे (नऊ लाख बारा हजार रु. किचे) ९७२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने मिळुन आले. सदर मिळुन आलेल्या दागिन्या बाबत त्यास विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने मागिल तीन चार महिन्यात श्रीरामपूर, नेवासा, कुकाणा, सोनई, पाथर्डी, जामखेड व एमआयडीसी परिसरात साथीदारासह चो-या केल्या असुन नेहमी प्रमाणे सदरचे सोने आम्ही आमचे ओळखीचा सोनार दादा संपत म्हस्के रा. नेवासा याचेकडे मोडण्यासाठी घेवुन चाललो होतो अशी माहिती दिली. नमुद माहितीचे आधारे अहमदनगर जिल्ह्यातील दाखल गुन्हे अभिलेख पडताळणी करता खालील प्रमाणे एकुण ०८ गुन्हे दाखल असुन आरोपीनी गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

आरोपी सचिन सुरेश भोसले याने त्याचे साथीदारासह मागिल तीन-चार महिन्या एकुण ०८ गुन्हे केल्याची कबुली दिली.


ताब्यात घेतलेल्या आरोपी नामे सचिन सुरेश भोसले यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे अंग काडतीमध्ये एका पांढ-या गोणीच्या पिशवीमध्ये विविध प्रकारचे ९,१२,०००/- रु. किचे (नऊ लाख बारा हजार रु. किचे) ९७२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने मिळुन आले. सदर मिळुन आलेल्या दागिन्या बाबत त्यास विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने मागिल तीन चार महिन्यात श्रीरामपूर, नेवासा, कुकाणा, सोनई, पाथर्डी, जामखेड व एमआयडीसी परिसरात साथीदारासह चो-या केल्या असुन नेहमी प्रमाणे सदरचे सोने आम्ही आमचे ओळखीचा सोनार दादा संपत म्हस्के रा. नेवासा याचेकडे मोडण्यासाठी घेवुन चाललो होतो अशी माहिती दिली. 

नमुद माहितीचे आधारे अहमदनगर जिल्ह्यातील दाखल गुन्हे अभिलेख पडताळणी करता खालील प्रमाणे एकुण ०८ गुन्हे दाखल असुन आरोपीनी गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

आरोपी सचिन सुरेश भोसले याने त्याचे साथीदारासह मागिल तीन-चार महिन्या एकुण ०८ गुन्हे केल्याची कबुली दिली.

आरोपी नामे सचिन सुरेश भोसले वय २३, रा. सलाबतपुर, ता. नेवासा हा विविध ठिकाणी विशेतः पुणे जिल्ह्यात आयोजित होणा-या बैल, घोडा व टांगा शर्यतेमध्ये सहभागी होवुन आपले अस्तित्व लपवुन गांवातील प्रतिष्ठीत लोकांचे शेतातील वस्तीवर वास्तव करत असल्याने त्यांचा शोध घेवुनही तो मिळुन येत नव्हता. नमुद आरोपी हा श्रीरामपूर शहर पो.स्टे. ६६९/२१ भादविक ३९५, ३९४, ४५८, १२० (ब) ३४ प्रमाणे दाखल गुन्ह्यास तपासाअंती आरोपी निष्पन्न होवुन गुन्ह्यास म.सं.गु.नि. कलम (मोक्का) ३ (१) (ग) ३ (२) व (४) वाढीव कलम लावण्यात आले होते.

नगर जिल्ह्याचा गुन्हे अभिलेख पडताळणी करता आरोपी नामे सचिन सुरेश भोसले याचेवर मोक्का, दरोडा, दरोडा तयारी, जबरी चोरी व चोरी अशा गंभीर स्वरुपाचे एकुण १० गुन्हे दाखल असुन त्या पैकी ०४ गुन्ह्यात आरोपी फरार आहे
  सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. सौरभ कुमार अग्रवाल साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व श्रीमती. स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर व श्री. संदीप मिटके साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग व श्री. संजय सातव साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या