औरंगाबाद मध्ये हत्याकांड; शिर्डीतून आरोपी जेरबंद
शिर्डी : औरंगाबाद शहरातील पुंडलिकनगर भागात सोमवारी सकाळी एका घरात पती पत्नीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यांच्या मुलानेच केवळ 700 रुपयांसाठी धारदार शस्त्राने निर्घृण खून करून आई-वडिलांचे मृतदेह पलंगाखाली लपवून घराला बाहेरून कुलूप लावून फरार झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी खुनी मुलगा आकाश हिरालाल कलंत्री यास शिर्डी येथून अटक केली.
शामसुंदर हिरालाल कलंत्री ( ५५) यांचे भांडे विक्रीचे दुकान आहे. शनिवारी मुलगा किरण याने हिशोबात घोळ केल्याचे वडील हिरालाल यांच्या लक्षात आले. त्यांनी हिशोबात कमी असलेले ७०० रुपयांचा जाब मुलगा आकाशला विचारला. यातून बापलेकात वाद झाले. यामुळे संतापलेल्या आकाशाने वडिलांची धारदार शस्त्राने हत्या केली. यावेळी घरी असलेल्या सावत्र आई किरण (४५ ) यांना देखील आकाशाने संपवले. यानंतर दोघांचे मृतदेह वेगवेगळ्या मजल्यावर पलंगाच्या खाली लपवून तो फरार झाला. पोलिसांनी तांत्रिक तपास करत आकाशचे लोकेशन ट्रेस केले. तो शिर्डी येथे असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी लागलीच याची माहिती शिर्डी पोलिसांना दिली. शिर्डी पोलिसांनी कारवाई करत लागलीच आकाशला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, आईवडिलां
च्या खुनानंतर आकाशने सावत्र बहिणीला आम्ही नातेवाईकांचा अपघात झाल्याने धुळे येथे जात आहोत, तू काकांकडे थांब, असे सांगितले होते. तिने रविवारी वडिलांचा फोन लागत नाही म्हणून घर गाठले. मात्र, घराला कुलूप असल्याने ती माघारी फिरली. चिंतेत असलेली मुलगी सोमवारी सकाळी पुन्हा घरी आली. यावेळी घरातून तीव्र दुर्गंधी येते होती. यामुळे मावशी सविता हिने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केल्यानंतर कलंत्री दाम्पत्याची हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच मुलगा आकाश गायब असल्याने, बहिणीने दिलेली माहिती यावरून पोलिसांनी तपास सुरु केला. तपासांती पोलिसांनी आकाशचा शोध लावत त्याला अटक केली.
0 टिप्पण्या