श्रीरामपूर:
माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांच्या पाठपुराव्याला यश आले असून गेल्या अनेक दिवसांपासून मागणी असलेला श्रीरामपूर नगरपालिकेचा जलतरण तलाव पोहण्यासाठी आज पासून खुला होणार आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्याची माहिती मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दिली.
श्रीरामपूर शहरात राज्य राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेले अनेक जलतरणपटू आहेत. त्यामुळे जलतरण तलाव सुरू ठेवावा, अशी मागणी नेहमी केली जाते. गेली दोन वर्ष कोरोना प्रादुर्भावामुळे हा जलतरण तलाव बंद होता. दरम्यान, लॉकडाउन उठविल्यानंतर बाजारपेठ, जिम, लग्नकार्य तसेच सर्व सार्वजनिक समारंभ नियमित सुरू झाले. त्यानुसार जलतरण तलावही सुरू करावा, अशी मागणी केली जात होती.
माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी तसेच पालिका प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. आता हा तलाव पुर्ववत सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याने जलतरणपटुंनी आनंद व्यक्त केला.
0 टिप्पण्या