बॉलिवूडमधील टॉप कलाकारांच्या यादीमध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचं नाव आवर्जुन घेतलं जातं. आपल्या बोलक्या अभिनयामुळे नवाजुद्दीन सिद्दीकी नावारुपाला आला. त्याने रुपेरी पडद्यावर साकारलेली प्रत्येक भूमिका कौतुकास्पदच आहे. शिवाय वेबसीरिज माध्यमामध्येही नवाजुद्दीनने आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नवाजुद्दीनमधील साधेपणामुळे प्रेक्षकांना तो आपल्यातला वाटतो. इतकंच नव्हे तर त्याचे लाखो चाहते आहेत. चाहत्यांचं आपल्यावर असलेल्या प्रेमाचा नवाजुद्दीन नेहमीच आदर करताना दिसतो. नुकताच नवाजुद्दीनचा एक असाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
नवाजुद्दीन एका इमारतीमधून बाहेर पडत असताना त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी केली होती. तो बाहेर येताच सगळ्यांनी त्याच्याबरोबर फोटो काढण्यास सुरुवात केली. पण नवाजुद्दीनच्या सुरक्षारक्षकांनी चाहत्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षारक्षकांचं हे कृत्य त्याच्या अजिबात पसंतीस पडलं नाही.
नेमकं काय घडलं?
नवाजुद्दीन इमारतीमधून बाहेर येताच सेल्फी घेण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली. मात्र सुरक्षारक्षक त्यांना हाताने बाजूला करत होते. तसेच धक्का देऊनही काही जणांना बाजूला करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आपल्याच चाहत्यांना दिलेली ही वागणूक नवाजुद्दीनला अजिबात आवडली नाही. त्याने सुरक्षारक्षकांचा हात बाजूला करत चाहत्यांना स्वतःबरोबर सेल्फी घेऊन दिला.
0 टिप्पण्या