“शोधू कुठं…शोधू कुठं…” म्हणत मुंबईच्या चाहत्यांनी चेन्नईच्या चाहत्यांना केलं ट्रोल


वानखेडे स्टेडियमवरचा मजेशीर

आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ५९ वा सामना खास ठरला. कारण या सामन्यात आतापर्यंत पाच वेळा जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या विजयामुळे चार वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या चेन्नई संघाच्या प्लेऑफर्यंत पोहोचण्याच्या आशा मावळल्या आहेत. या सामन्यात मुंबईचा पाच गडी आणि पाच षटके एक चेंडू राखून विजय झाला असून चेन्नईचा पराभव झाला. मुंबईसमोर विजयासाठी ९८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मुंबईने ही धावसंख्या पाच गडी राखून गाठली.

दरवर्षी चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्येही स्पर्धा दिसते. कोण जिंकणार कोण हरणार, कोण बेस्ट आहे अशा अनेक पोस्टने संपूर्ण सोशल मीडिया भरलेलं असतं. यंदा दोन्ही संघाची कामगिरी तशी चांगली नसल्यामुळे टेबल पॉईटवर दोन्ही संघ खाली होते. यायचं परिमाण दोन्ही संघाचे चाहतेही शांतच दिसले. पण १२ मे ला झालेल्या सामन्यात मुंबईने चेन्नई संघाच्या हरवून त्या संघाच्या प्लेऑफर्यंत पोहोचण्याचा मार्ग बंद केला. याच मॅच दरम्यानचे अनेक व्ह्डीओ, फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. असाच एक वानखेडे स्टेडियमवरचा मुंबईच्या चाहत्यांचा चेन्नईच्या चाहत्यांना चिडवतानाचा मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

१२ मे ला ‘कौस्तुभ मलबारी’ नावाच्या अकाऊंटवरून फेसबुकवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो लोकांनी बघितलं आहे. ही पोस्ट १.५ हजार लोकांनी शेअरही केली आहे. अनेकांनी यावर कमेंट करत आपली प्रतिक्रिया या व्हिडीओवर नोंदवली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या