पती- पत्नीचे भांडणाने घेतला सहा मुलांचा जीव

 


महिलेने सहा मुलांना फेकले विहिरीत



पती-पत्नीतील भांडणानंतर महिलेले स्वतः आत्महत्येचा प्रयत्न करत सहा मुलांना विहिरीत फेकून दिले. या महिलेला वाचविण्यात  गावकऱ्यांना यश आले असले तरी सर्व मुलांचा विहिरीत बुडून करुण अंत झाला. महाड तालुक्यात असलेल्या शेलटोली गावात चिखुरी सहानी हा मजूर रहातो सोमवारी सकाळी त्याचे व पत्नीचे भांडण झाले नेहमी दारू पिऊन मारहाण करणाऱ्या पतीला वैतागल्याने पत्नी अरुणा आपल्या पोटच्या सहा मुलांना विहिरीत ढकलून स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.  परंतु गावकऱ्यांनी तिला वाचवले.
सहानी दाम्पत्य हे मूळचे उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. या घटनेने रायगड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरला.

विहिरीत फेकलेल्या सहा मुलांपैकी चार मुली आहेत तर दोन मुलं आहेत. सोमवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास महिलेने घराशेजारील विहिरीत या सहा मुलांना फेकले. सहापैकी पाचजणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून एका मुलाचा मृतदेह बाहेर काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते. सायंकाळच्या सुमारास पती पत्नीचे भांडण झाल्याने महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण महिलेला वाचविण्यात गावकऱ्यांना यश आले. मात्र दुर्दैवी घटनेत चार मुली आणि दोन मुलांचा करुण अंत झाला.

ही धक्कादायक घटना समजताच महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी मोटारसायकवर ढालकाठी बिरवाडी गावाच्या दिशेने धाव घेतली. प्रशासनाचे महत्त्वाचे अधिकारीही  ढालकाठी  गावाच्या दिशेने रवाना झाले.

मृत्युमुखी चिमुरड्यांची नावे 


रोशनी - (वय 10 वर्षे)
करिष्मा - (वय 08 वर्षे)
रेश्मा - (वय 06 वर्षे)
विद्या - (वय05 वर्षे)
शिवराज - (वय 03 वर्षे)
राधा - (वय 1.5 वर्षे)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या