पुणे : दहशतवादी विरोधी पथकाने जुनेद मोहोम्मद नावाच्या या तरुणाला दापोडी परिसरातून अटक केली आहे. काश्मिरमधील दहशतवादी संघटनांनी संबंधित तरुणाला पैसे पुरवल्याचा संशय आहे. पुणे एटीएसचे पथक आणखी चौकशी करत असून अटक केलेल्या तरुणाला थोड्याच वेळेत शिवाजीनगर इथल्या न्यायालयात हजर करणार आहे.
जुनेदच्या बँक खात्यात दहा हजार रुपये हे ‘गजवाये हिंद’ या संघटनेने ट्रान्सफर केल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती एटीएसच्या सूत्रांनी दिलीय. जुनेदला पुण्यातील कोर्टात आज हजर करण्यात येणार आहे. त्यानंतरच या प्रकरणासंदर्भाती अधिक माहिती समोर येईल असं सांगण्यात आलंय.
0 टिप्पण्या