मनोरंजन क्षेत्रातील सर्व घडामोडी एकाच क्लिकवर


मनोरंजन क्षेत्रात सध्या अभिनेता आमिर खानचा भाचा इम्रान खान त्याच्या घटस्फोटाच्या वृत्तामुळे चर्चेत आहे. तर दुसरीकडे बॉलिवूडबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत राहिलेला दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू पान मसालाची जाहिरात केल्यानं सोशल मीडिया ट्रोल होताना दिसतोय. याशिवाय बॉलिवूड क्वीन कंगना रणौतनं पुन्हा एकदा बॉलिवूडमधील घराणेशाही आणि स्टार किड्सवर निशाणा साधत टीका केली आहे. स्टार किड्समुळेच बॉलिवूडचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकत नसल्याचं तिने म्हटलंय.

मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.

पूजा हेगडेने का घातलं सलमान खानचं ब्रेसलेट? फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली…

रुपेरी पडद्यावर पूजा हेगडेने साकारलेल्या प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडल्या. आताही तिच्या हाती बॉलिवूडचे बिग बजेट चित्रपट आहेत. चित्रपटांमुळे चर्चेत असणाऱ्या पूजाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तिने सलमान खानचं ब्रेसलेट घातलं आहे.

बॉलिवूड स्टार किड्स पुन्हा कंगनाच्या निशाण्यावर! म्हणाली, “ते सगळे उकडलेल्या अंड्यांसारखे…”

बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या विरोधात कंगना रणौत नेहमीच आवज उठवताना दिसली आहे. ती नेहमीच बॉलिवूडच्या स्टार किड्सवर निशाणा साधताना दिसते. बॉलिवूड स्टार किड्समुळे बाहेरुन आलेल्या कलाकारांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं असं कंगना नेहमीच म्हणताना दिसते. आता पुन्हा एकदा तिने बॉलिवूड स्टार किड्सवर निशाणा साधताना त्यांची तुलना उकडलेल्या अंड्यांशी केली आहे.

पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे महेश बाबू ट्रोल, युजर्स म्हणाले; “बॉलिवूडला परवडणार नाही पण…”

दाक्षिणात्य अभिनेता महेशबाबूने काही दिवसांपूर्वीच त्याचा चित्रपट ‘मेजर’च्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात बॉलिवूडबाबत केलेलं वक्तव्य ‘मी बॉलिवूडला परवडणार नाही’ सोशल मीडियावर जोरदार चर्चेत होतं. त्याच्या या वक्तव्यामुळे बराच वाद झाला होता. आता नेटकऱ्यांनी त्याच्या या वक्तव्याचा संदर्भ घेऊन त्याला पान मसाल्याची जाहिरात केल्याबद्दल ट्रोल केलं आहे.

इम्रान खान घेणार पत्नी अवंतिका मलिकपासून घटस्फोट? चर्चांना उधाण

मागच्या काही काळापासून इम्रान त्यांच्या पत्नीसोबत बिघडलेल्या संबंधांमुळे चर्चेत आहेत. इम्रान खाननं २०११ मध्ये अवंतिका मलिकसोबत लग्न केलं होतं. मात्र २०१९ मध्ये या दोघांमध्ये भांडण सुरू असल्याचं समोर आलं. त्यानंतर सातत्यानं या दोघांमधील वादाची चर्चा झाली आणि आता दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या