चालकाची झोप लागली अन् घात झाला


यमुना एक्स्प्रेसवर भीषण अपघातात पुण्यातील पाच जणांचा मृत्यू

यमुना एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी झालेल्या या अपघातात मृत पावलेले सर्वजण पुण्याचे रहिवासी आहेत. मृतांमध्ये चार महिलांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या वाहनाने ट्रकला धडक दिली.

पोलिसांनी सांगितल्यानुसार, पहाटे ५ वाजता जेवर टोलनाक्यापासून ४० किमी अंतरावर हा अपघात झाला. अपघातानंतर सर्वांना जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आलं होतं. यावेळी पाच जणांना मृत घोषित करण्यात आलं तर दोघांवर कैलाश रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सर्व प्रवासी महाराष्ट्रातील असून ६० वर्षाच्या वयोगटातील आहेत. चालकाची झोप लागल्याने हा अपघात झाला असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी सध्या ट्रक जप्त केला आहे.

याप्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. नातेवाईक पोहोचल्यानंतर मृतदेह त्यांच्या ताब्यात दिले जातील. गेल्या आठवड्यात यमुना एक्स्पेसवेवर मथुराजवळ मागून येणाऱ्या कारने धडक दिल्यानंतर सात जणांचा मृत्यू झाला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या