Breaking News

रायगड: घोणसे घाटात खासगी बस दरीत कोसळली; दोघे जागीच ठार, ३० जखमी


रायगड जिल्‍हयात माणगाव ते श्रीवर्धन मार्गावर घोणसे घाटात भीषण अपघात झाला आहे. एक खासगी बस घोणस घाटात दरीत कोसळली. या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून ३० प्रवासी जखमी झाले आहेत. मुंबईतील नालासोपारा इथून प्रवासी घेऊन बोर्ली-श्रीवर्धनकडे निघालेल्‍या खासगी बसला हा अपघात झाला. सकाळी साडेआठ वाजण्‍याच्‍या सुमारास घोणसे घाटात अवघड वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्‍याने हा अपघात झाल्‍याची प्राथमिक माहिती आहे.

पोलीस आणि स्‍थानिकांनी घटनास्थळी पोहोचून मदत कार्य सुरू केले आहे. जखमींना म्‍हसळा येथील उपजिल्‍हा रूग्‍णालयात उपचारासाठी हलवण्‍यात आले आहे. म्हसळा तालुक्यातील धनगर मलई परिसरातील मुंबईत राहणारे नागरिक आपल्या गावाला एका कार्यक्रमासाठी येथे येत असताना अपघात झाला, अशी माहिती समोर आली आहे.

Post a Comment

0 Comments