पाटोदा (प्रतिनिधी )दि.१५. पाटोदा शहरातील जुनी बाजारपेठ असलेली जुने स्टँड अर्थात भगवान बाबा चौक ते बाजार तळातील गणपती मंदिरापर्यंत छोटे व्यापारी, भामेश्वर मंदिर , तसेच भगवान महावीर स्थानक असून व जामा मज्जित , या अरुंद रस्त्यावर जड वाहतूक करणारे मोठी वाहणे सतत मिरवत असल्याने या रस्त्यावर सदा सर्वदा वाहतूक कोंडी होत असल्याने या परिसरात शहरवासीयांना मोकळा श्वास घेण्यासाठी पाटोदा नागरपंचायतचे लोकप्रिय नगराध्यक्ष लक्ष देतील का अशी मागणी होत आहे.
या बाबत अधिक वृत्त असे की पाटोदा शहरातील जुनी मुख्य बाजारपेठ म्हणून जुने बस स्टँड ओळखले जाते , आजही या अरुंद रस्त्यावर सोन्याची दुकाने, बांगड्याची, भांड्याची दुकाने आहेत, तसेच सर्वच धार्मिक स्थळे याच रस्त्यावर असल्याने महिला , शेतकरी, ग्रामीण भागातील शेतकरी यांची सतत वर्दळ असते, याच रस्त्यावर छोट्या व्यापाराची दुकाने असून , मोठ्या व्यापारी वर्गाची गोडाऊन आहेत , तसेच दुकांचा माल खाली करण्यासाठी मोठं मोठी जड वाहने या रस्त्याने मिरवत असल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यालगत बाजार असून या जड वाहनांची बाजारकरूंना त्रास होत आहे.या अरुंद रस्त्यावरील जड वाहतुकी बाबत छोट्या छोट्या व्यापाऱ्यांनी नागरपंचायत कडे तक्रार केली आसतांना नागरपंचायत याकडे दुर्लक्ष करत असून , आतातरी नूतन नगराध्यक्ष यांनी या मुख्य रस्त्याचा प्रश्न निकाली काढावा अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे
0 टिप्पण्या