हॉट लूकची होतेय चर्चा
बी-टाऊनमध्ये आयोजित करण्यात येणारी प्रत्येक पार्टी ही टॉक ऑफ द टाऊन असते. एखाद्या सेलिब्रिटीच्या घरी हाऊस पार्टी असो वा एखाद्या चित्रपटाची पार्टी असो चर्चा ही होतेच. डिझायनर ड्रेस, मेकअप, दागिने घातलेल्या बॉलिवूडच्या अभिनेत्री या पार्ट्यांमध्ये हजेरी लावताना दिसतात. पार्टी कोणतीही असो पण यासाठी नट्यांचा असलेला लूक रेड कार्पेटपेक्षा काही कमी नसतो. अशा बऱ्याच पार्ट्यांदरम्यानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेले आपण पाहतो. बी-टाऊनमधील अशाच एका पार्टीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
अभिनेत्री करिश्मा कपूरने तिच्या घरी एका पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला बॉलिवूडमधील तिच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती. मलायका अरोरा, मनिष मल्होत्रा, अमृता अरोरा, संजय कपूर, करण जौहर, करीना कपूर खान आदी मंडळी या हाऊस पार्टीला उपस्थित होती. यावेळी चर्चा झाली ती करीना आणि मलायकाच्या हॉट लूकची. या दोघींनी परिधान केलेल ड्रेस विशेष लक्षवेधी होते.
करीनाने मल्टी कलरचा शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसवर तिने घेतली पर्स आणि हाय हिल्स चर्चेचा विषय ठरत होते. तर करीनाच्या लूकला टक्कर देत होती ती मलायका अरोरा. मलायकाने ब्रालेट टॉप आणि क्रिम रंगाची पँट परिधान केली होती. या ड्रेसवर मलायकाने हाय हिल्स घातले होते. या कपड्यांमध्ये एकापेक्षा एक सुंदर पोझ देत मलायकाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
मनिष मल्होत्राने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या पार्टीदरम्यानचे फोटो शेअर केले. यामध्ये बी-टाऊनमधील इतर मंडळीही मजा-मस्ती करताना दिसले. करिश्माने या पार्टीसाठी काळ्या रंगाचा ड्रेस परिधान करणं पसंत केलं होतं. बी-टाऊनमधील अभिनेत्रींचा ग्लॅमरस अंदाज या पार्टीनिमित्त पुन्हा एकदा पाहायला मिळाला.
0 टिप्पण्या