दैनिक राष्ट्र सह्याद्रीने काढलेल्या विशेष पुरवणीचे जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या हस्ते प्रकाशन

 नेवासा (प्रतिनिधी) राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री नामदार शंकरराव गडाख यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दैनिक राष्ट्र काढलेल्या विशेष पुरवणीचे प्रकाशन जेष्ठ नेते यशवंतराव गडाख ,नामदार शंकरराव गडाख, युवा नेते उदयनदादा गडाख यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी पुरवणीचे वाचन करत संपादक करण नवले यांनी अहमदनगर उस्मानाबाद व पुणे येथे काढलेल्या राष्ट्र सह्याद्री आवृतीबद्दल समाधान व्यक्त करत त्यांच्या धाडसाचे व कार्याचे यावेळी कौतुक केले.यावेळी हितचिंतकांच्या व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्र सह्याद्रीने काढलेल्या अभिष्टचिंतन विशेषांक पुरवणीचे प्रकाशन करण्यात आले.

 यावेळी दैनिक राष्ट्र सह्याद्रीचे प्रतिनिधी व नेवासा प्रेस क्लबचे अध्यक्ष पत्रकार सुधीर चव्हाण यांनी अंकाचे वाटप करत नामदार शंकरराव गडाख यांचा पुस्तके व बुके भेट देऊन राष्ट्र सह्याद्री परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आदर्शगाव सुरेशनगरचे सरपंच पांडुरंगउभेदळ ,हंडीनिमगावचे सरपंच अण्णासाहेब जावळे ,मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश सावंत ,प्रवरासंगमचे माजी सरपंच सुनील बाकलीवाल ,कुकाणा प्रतिनिधी इस्माईल शेख यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या