अहमदनगर : महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नगरमध्ये जंगी स्वागत स्वीकारून औरंगाबादकडे रवाना झाले. मात्र, काही अंतर गेल्यानंतर घोडेगाव (ता. नेवासा) जवळ त्यांच्या ताफ्यातील गाड्यांना किरकोळ अपघात झाला.
मागील बाजूला असलेल्या तीन गाड्या एकमेकांना धडकल्या. यामध्ये कोणीही जखमी नाही. अभिनेते केदार शिंदे, आणि अंकुश चौधरी या वाहनांतून प्रवास करीत होते.त्यांच्या गाडीच्या बोनेटचे किरकोळ नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. ताफा न थांबता औरंगाबादकडे रवाना झाला आहे. दरम्यान, नगरध्ये राज ठाकरे यांच्या वाहनांच्या ताफ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. कार्यकर्त्यांनी जय श्रीराम अशी घोषणा दिल्या. ताफा चौकात आला त्यावेळी खांबावर आधीच बसविण्यात आलेल्या भोंग्यावरून हनुमान चालिसा लावण्यात आली होती.
0 टिप्पण्या