केजरीवाल यांना पंतप्रधान करण्यासाठी 'आप' कार्यकर्त्यांनी कामाला लागावे -प्रीती मेनन-शर्मा


अरविंद केजरीवाल यांना श्रीरामपुरात आणणार- तिलक डुंगरवाल

श्रीरामपूर : 'आप'ला महाराष्ट्रातून जोरदार प्रतिसाद मिळत असून सर्वत्र अगदी श्रीरामपुरातही निश्चित राजकीय परिवर्तन होणार, असा ठाम विश्वास आम आदमी पार्टी मुंबई अध्यक्षा तसेच राष्ट्रीय प्रवक्त्या प्रिती मेनन-शर्मा यांनी व्यक्त करत अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधान करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागायचे आव्हान केले. 

आम आदमी पार्टीच्या जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा उत्तर जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल यांच्या अध्यक्षतेखाली श्रीरामपूर नगरपालिका सभागृहात प्रचंड उत्साही वातावरणात नुकताच संपन्न झाला. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय प्रवक्त्या मुंबई अध्यक्ष प्रिती मेनन-शर्मा, या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहिल्या. यावेळी राष्ट्रीय परिषद सदस्य किरणजी उपकारे, राज्य कार्यकारणी सदस्य जिवेंद्र तिवारी, दक्षिण जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड, तालुका अध्यक्ष विकास डेंगळे, सादिक शिलेदार, प्रशांत पांडे, आदी मार्गदर्शन केले  

यावेळी बोलताना श्रीमती शर्मा यांनी संपूर्ण राज्यासह जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा मुद्देसूद आढावा घेतला. नगर जिल्ह्यात वेगवेगळ्या राजकीय पक्षात असलेल्या परंतु प्रत्यक्षात एकमेकांचे घनिष्ट स्नेहसंबंध असणाऱ्या लोकांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी शोषणाचे राजकारण करत असल्याचा आरोप केला. सर्वांवर मोठाल्या घोटाळ्यांचे आरोप आहेत. परंतु हे सर्वच जण एकमेकांना वाचवत असल्याकडे त्यांनी यावेळी लक्ष वेधले. त्यामुळे यापुढील काळात आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बुथनिहाय दारोदार प्रचार यंत्रणा राबवून सर्वच निवडणुका स्वबळावर लढविण्याचे आवाहन त्यांनी केले. 

यावेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष तिलक डुंगरवाल म्हणाले गेल्या अनेक वर्षापासून उत्तर नगर जिल्ह्यातील संपूर्ण तालुका व शहरात सामान्य नागरिकांचे प्रश्न प्रलंबित प्रश्नांसाठी सातत्याने आंदोलन करून सरकार व स्थानिक प्रतिनिधींना जाग आणली  वीज, रस्ते, आरोग्य, शैक्षणिक आदी प्रश्नांवर आवाज उठवून न्याय मिळवून देण्याचे काम सर्व कार्यकर्त्यांना मुळे शक्य झाले.

यापुढील काळात होणाऱ्या सर्व निवडणुका राज्य कमिटीच्या परवानगीने आम आदमी पार्टी संपूर्ण ताकदीने लढवणार असून महाविकास आघाडी, भाजप व इतर पक्षांना पर्याय म्हणून तिसरी शक्ती आपच्या माध्यमातून निर्माण होईल. तरुणांनी निवडणूक जिंकण्याचा चंग बांधला असून येत्या काळात वेगळे चित्र पाहायला मिळेल असा विश्‍वास डुंगरवाल यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी 'मेळाव्याचे आयोजक तालुकाध्यक्ष विकास डेंगळे, जिल्हा सचिव राहुल रणपिसे, जिल्हा कोषाध्यक्ष दिनेश जाधव, प्रवक्ते प्रवीण जमदाडे, हनीफ बागवान, प्रशांत पांडे, प्रसाद शेंगदाणे, नेवासा शहराध्यक्ष संदीप आलवणे, प्रवीण तिरोडकर, देवराम सरोदे, अण्णासाहेब लोंढे, श्रीधर कराळे, एडवोकेट दिनेश जाधव, संतोष नवलखा, बजरंग सरडे, अशोक डोंगरे, शरद शिंदे, उमेश गायकवाड, मनोज गोपाळे, राजू भाई शेख, बी एम पवार, आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सह महिलाही मोठा संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा प्रवक्ता प्रविण जमधडे यांनी केले तर शेवटी राहुल रणपिसे यांनी आभार मानले.


नियोजनाचे कौतुक - 

आम आदमी पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यास जमलेली तुडुंब गर्दी व त्यांच्यात ओसंडून वाहणारा उत्साह पाहून प्रभावित झालेल्या प्रिती मेनन-शर्मा यांनी पक्षाचे उत्तर जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, विकास डेंगळे, यांच्या संघटन कौशल्य व नियोजनाचे कौतुक केले.

'त्या' कारखान्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा 

साखर कारखान्यांचा गळीत हंगाम समारोप होण्याची वेळ आली तरी ठराविक ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला तोड मिळाली नसल्याच्या नैराश्यातून नगर व बीड जिल्ह्यात काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर याप्रकरणी ज्या साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात या दुर्दैवी घटना घडल्या त्या त्या कारखाना व्यवस्थापनांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची जाहीर मागणी प्रिती शर्मा-मेनन यांनी यावेळी केली.

महाराष्ट्रातील सत्ताबदल श्रीरामपूरातून 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना श्रीरामपुरात आणणार असून महाराष्ट्रातील सत्ता परिवर्तनाची सुरुवात श्रीरामपूरातून करू असा निर्धार आम आदमी पार्टीचे उत्तर जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल यांनी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या