“मी मालिका सोडलेली नाही…”


‘मन उडू उडू झालं’ मालिका सोडण्यावर हृता दुर्गुळेचे स्पष्टीकरण

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेकडे पाहिलं जाते. सध्या ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरताना दिसत आहे. ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेत इंद्रा आणि दिपूची हटके लव्हस्टोरी प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून दिपूची भूमिका साकारणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने मालिका सोडल्याची चर्चा सुरु होती. या सर्व चर्चांवर हृताने नुकतंच एका मुलाखतीत स्पष्टीकरण दिले आहे.


छोट्या पडद्यावरील ‘फुलपाखरु’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून हृता दुर्गुळेला ओळखलं जाते. हृताने ‘फुलपाखरु’ या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली. ती नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अशी तिची ओळख आहे. हृता ही सध्या ‘मन उडू उडू झालं’ मालिकेत दिपूची भूमिका साकारताना दिसत आहे. या भूमिकेमुळे हृता ही चांगलीच प्रसिद्धीझोतात आली आहे.

हृता दुर्गुळे ही मालिका सोडत असल्याची बातमी सर्वत्र व्हायरल झाली होती. ती ही मालिका का सोडते? याबाबत अनेक प्रश्नही उपस्थित केले गेले होते. मात्र नुकतंच या सर्व चर्चांवर हृताने स्पष्टीकरण दिले आहे. ‘मी ही मालिका सोडलेली नाही’, असे तिने या मुलाखतीदरम्यान म्हटले.

हृता दुर्गुळेने नुकतंच एबीपी माझाला मुलाखत दिली. त्यावेळी ती म्हणाली, “मी ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका सोडलेली नाही. या केवळ अफवा आहेत. सध्या मी या मालिकेचे शूटिंग करत आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी तसेच चाहत्यांनी कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका”, अशी विनंती तिने केली.

दरम्यान हृता आणि ‘मन उडू उडू झालं’ मालिकेच्या निर्मात्यांचे भांडण झाले होते. या मालिकेच्या सेटवर स्वच्छता नसल्याने त्यांच्यात वाद झाल्याचे बोललं जात आहे. हा वाद विकोपाला गेल्यानंतर हृताने ही मालिका सोडण्याचा तडकाफडकी निर्णय घेतल्याची माहिती समोर आली होती. तसेच ती लग्नबंधनात अडकणार असल्याने, नाटकांच्या प्रयोगामुळे आणि ‘अनन्या’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रचंड व्यस्त आहे. त्यामुळे ती ही मालिका सोडत असल्याची चर्चाही रंगली होती. मात्र नुकतंच या सर्व चर्चांवर तिने स्पष्टीकरण दिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या