फ्युचरिस्टिक क्लास रूमची किमया
जिल्हा परिषदेची शाळा म्हटल कि आपल्या डोळ्यासमोर येते ते जिर्ण झालेल्या भिंती, फार बरे नसलेले बेंच व कमी विद्यार्थी संख्या. पण आता जिल्हा परिषदेच्या शाळांचे चित्र बदललं आहे, जिल्हा परिषदेच्या शाळा केवळ डिजिटलच होत नाहीयेत तर त्यात अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना राबवल्या जात आहेत. अशीच 'फ्युचरीस्टिक क्लास रुमची संकल्पना राबवली आहे अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील पानोली जिल्हा परिषद शाळेने. ई-डेस्क, ई-पोडियम, इंटरअक्टिव्ह स्क्रीन असं दृश्य पानोली इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत पाहायला मिळतं. पानोलीच्या ग्रामस्थांनी लोकसहभागातून ही 'फ्युचरीस्टिक क्लास रुम' उभी केली आहे. यासाठी तब्बल 40 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. या क्लासरुममध्ये प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र ई-डेस्क आहेतर शिक्षकांसाठी ई-पोडियम. आता विद्यार्थ्यांच्या हातात वह्या-पुस्तकांऐवजी इंटरअक्टिव्ह स्क्रीन देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा प्रत्येक डेस्क हा या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून शिक्षकांच्या पोडियमशी जोडला गेला आहे. विद्यार्थ्यांच्या ई-डेस्कमध्ये अभ्यासक्रमातील सर्व धडे रंजकपद्धतीने स्टोअर करुन ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतरही अक्टिव्हिटी त्यात आहेत. ई-डेस्क, ई-पोडियम, इंटरअक्टिव्ह स्क्रीन असं दृश्य पानोली इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत पाहायला मिळतं. पानोलीच्या ग्रामस्थांनी लोकसहभागातून ही 'फ्युचरीस्टिक क्लास रुम' उभी केली आहे. यासाठी तब्बल 40 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. या क्लासरुममध्ये प्रत्येक विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र ई-डेस्क आहेतर शिक्षकांसाठी ई-पोडियम. आता विद्यार्थ्यांच्या हातात वह्या-पुस्तकांऐवजी इंटरअक्टिव्ह स्क्रीन देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा प्रत्येक डेस्क हा या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून शिक्षकांच्या पोडियमशी जोडला गेला आहे. विद्यार्थ्यांच्या ई-डेस्कमध्ये अभ्यासक्रमातील सर्व धडे रंजकपद्धतीने स्टोअर करुन ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतरही अक्टिव्हिटी त्यात आहेत.
0 टिप्पण्या