रियान परागच्या ‘या’ कृतीमुळे भडकले चाहते; जाणून घ्या नक्की काय झाले


आयपीएल २०२२ च्या ६३ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने लखनऊ सुपर जायंट्सचा २४ धावांनी पराभव केला. या विजयानंतर राजस्थानचा संघ प्लेऑफच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे, तर पराभवामुळे लखनऊचा प्लेऑफचा मार्ग कठीण झाला आहे. राजस्थानने २० षटकांत ६ बाद १७८ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली आणि लखनऊला ८ बाद १५४ धावांवर रोखले. राजस्थान १३ सामन्यांतून ८ व्या विजयासह १६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे तर लखनऊने १३ सामन्यांतून पाचव्या पराभवानंतर १६ गुणांसह तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. सामन्यादरम्यान राजस्थान रॉयल्सचा क्षेत्ररक्षक रियान परागने असे कृत्य केले, ज्यामुळे तो आता सोशल मीडियावर खूप ट्रोल होत आहे.

लखनऊच्या डावाच्या २०व्या षटकात रियान परागने प्रसिद्ध कृष्णाच्या लाँग-ऑनवर मार्कस स्टॉइनिसचा झेल घेतला. त्याचा झेल घेत राजस्थानने आपले दोन गुण निश्चित केले. मात्र, झेल पकडल्यानंतर परागने ज्याप्रकारे सेलिब्रेशन केले, त्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. परागने झेल पकडल्यानंतर चेंडू जमिनीच्या अगदी जवळ नेला आणि त्याला चेंडू जमिनीला लावायचा आहे असे वाटले. जरी तो हे विनोद करत होता, पण त्याच्या या कृतीमुळे पराग आता चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे आणि सोशल मीडियावर त्याला खूप ट्रोल केले जात आहे.

सोशल मीडियावरील चाहत्यांचे परागशी नेहमीच वेगळे नाते राहिले आहे. पण यावेळी मॅथ्यू हेडन आणि इयान बिशपसारखे समालोचकही या २० वर्षीय क्षेत्ररक्षकाच्या सेलिब्रेशनवर नाराज दिसले. इतर चाहत्यांनी या कृत्याबद्दल परागवर तीव्र टिका केली. ‘या मूर्ख रियान परागने टिव्हीवर नौटंकी करून सर्वांना मूर्ख बनवले… त्याला या स्पर्धेतून बाहेर काढले पाहिजे, असे एका यूजरने म्हटले आहे.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या