औरंगाबाद : खेळण्या बागडण्याचं वय असलेल्या अवघ्या सहाव्या वर्षी जन्मदात्या बापाचीच स्वतःच्या मुलीवर वाईट नजर पडली. घरातच तिच्यावर लैंगिक अत्याचार सुरू झाले. तब्बल ११ वर्षे या नरकयातना भोगल्यावर युवती घरातून पळून गेली. मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तिचा शोध घेतला.तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता बाप- लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक आपबिती त्या १७ वर्षीय युवतीने कथन केली.ते ऐकून पोलिसांच्या पाया खालची वाळू सरकली. मुकुंदवाडी व पुंडलीकनगर पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता गुन्हा दाखल करून आरोपी नराधम बापाला आज बेड्या ठोकल्या.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात देण्यात आली होती.पोलिसांनी त्या बेपत्ता मुलीचा शोध घेऊन तिला परभणी जिल्ह्यातून औरंगाबादला आणले. मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात आणले. त्या मुलीला ठण्यातील महिला अधिकाऱ्यांनी विश्वासात घेत विचारपूस केली असता. वडीलच अत्याचार करीत असल्याचे तिने पोलिसांना सांगितले.
अवघ्या ६ वर्षाची असताना बापाची वाईट नजर तिच्यावर पडली होती. तेंव्हा पासून जन्मदाता बापच लैंगिक अत्याचार करीत होता.तब्बल ११ वर्षे या नरकयातना तिने निमूटपणे सहन केल्या. दीड महिन्यांपूर्वी पुन्हा आरोपी बापाने इच्छे विरुद्ध युवतीवर बलात्कार केला. त्यामुळे ती परभणी जिल्ह्यातील एका मित्राकडे पळून गेली होती,अशी माहिती तिने पोलिसांकडे दिली. मुकुंदवाडी पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा नुसार आरोप बापा विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. हे प्रकरण पुंडलिकनगर पोलीस ठाणे हद्दीतील असल्याने झिरो ने तो वर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक ब्रह्मा गिरी यांनी दिली.
या पूर्वी आरोपीला सातवर्षीय मुलीच्या अपहरण प्रकरणी शिक्षा झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक ब्रह्मा गिरी यांनी दिली. स्वतःच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या या आरोपीनं सन २०१३ मध्ये एका ७ वर्षीय मुलीचे अपहरण केले होते.या गुन्ह्यामध्ये त्याला न्यायालयाने दोषी ठरविले आहे.अशी माहिती तपासात समोर आली आहे, असं मुकुंदवाडीचे पोलीस निरीक्षक ब्रह्मा गिरी यांनी सांगितलं.
0 टिप्पण्या