अभय योजनेचा महावितरणच्या कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांनी लाभ घ्यावा - विजय भारंबे


पाटोदा :
लोकनेते माझी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख हे कायम शेतकरी,सर्व सामान्यांच्या हिताचा विचार करत असल्याने महाराष्ट्र सरकारने त्यांच्या नावाने राज्य सरकार ऊर्जा विभागाने विलासराव देशमुख अभय योजना सुरू केली असून हा निर्णय सर्वसामान्यांना दिलासा देणारा आहे. 

    'विलासराव देशमुख अभय योजना' ही थकीत वीजबिल आणि कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांसाठी असून या योजने अंतर्गत एकरकमी थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांना 100% व्याज व विलंब शुल्क माफी देण्यात येणार असल्याने महावितरणच्या ग्राहकांना ह्या योजनेचा खुप मोठा फायदा होणार असल्यामुळे पाटोदा तालुक्यातील ग्राहकांनी या योजनेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा.

     तसेच अधिक माहितीसाठी पाटोदा महावितरणसी संपर्क साधावा आशे आवाहन पाटोदा महावितरण उपविभागीय कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता विजय भारंबे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या