वडिलांवर लावलेल्या आरोपांवरून शत्रुघ्न सिन्हांचा मुलगा भडकला


‘बिग बॉस ५’मध्ये सहभागी झालेली अभिनेत्री पूजा मिश्रानं काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध अभिनेता आणि राजकीय नेता शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले होते. पूजानं शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांची पत्नी पूनम यांच्यावर आपलं करिअर संपवल्याचा आणि सेक्स स्कॅम केल्याचा आरोप केला होता. एवढंच नाही तर पूनम सिन्हा यांनी काळ्या जादूचा वापर केल्याचंही तिनं म्हटलं होतं. “माझं कौमार्य विकून शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या मुलीचं करिअर उभं केलं” असा धक्कादायक आरोप पूजा मिश्रानं केलं होता. यावर आता शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लव सिन्हानं प्रतिक्रिया दिली आहे.


पूजा मिश्रानं केलेल्या या धक्कादायक आणि गंभीर आरोपांवर बोलताना लव सिन्हा म्हणाला, “त्या महिलेला प्रोफेशनल मदतीची गरज आहे. तिनं माझ्या कुटुंबावर ज्याप्रकारे आरोप केले आहेत. त्यावरून तिची मानसिक स्थिती ठीक नसल्याचं दिसून येत आहे. सामान्यतः मी सोशल मीडियावरील अशा प्रकारच्या गोष्टींवर प्रतिक्रिया देत नाही पण मला वाटतं अशा प्रकारच्या बातम्या पसरवणं किंवा छापणं चुकीचं आहे.” आपल्या एका ट्वीटमध्ये त्यानं म्हटलंय, “अशा प्रकारच्या बातम्या छापताना किंवा प्रसारित करताना संबंधितांना समजलं पाहिजे की यासाठी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. पूजा मिश्रानं लावलेले आरोप अतिशय घृणास्पद आणि खोटे आहेत.”

काय होते पूजा मिश्राचे आरोप?

अभिनेत्री पूजा मिश्रानं शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या कुटुंबीयांवर तिच्यासोबत सेक्स स्कॅम केल्याचा आरोप केला होता. “सिन्हा कुटुंबीय मला बेशुद्ध करून सेक्स ट्रेड करत असे. माझं कौमार्य विकून त्यांनी सोनाक्षी सिन्हाला स्टार केलं आहे.” पूजाचा दावा आहे की, तिचे वडील आणि शत्रुघ्न सिन्हा चांगले मित्र होते. मात्र शत्रुघ्न सिन्हा आणि त्यांच्या कुटुंबीयांमुळे तिच्या हातून ३५ पेक्षा जास्त चांगले चित्रपट निघून गेले. पूजा मिश्रानं या आधी अभिनेता सलमान खानवर देखील बलात्काराचा आरोप केला होता. मात्र नंतर तिने असे आरोप केल्याचं नाकारलं होतं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या