“तुला नेमकं काय झालं?”, प्रियांका चोप्राचा जखमी चेहरा पाहून चाहते चिंतेत, अभिनेत्री म्हणते…


चाहत्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून कसं घेता येईल? हे देसी गर्ल प्रियांका चोप्राला अचूक ठाऊक आहे. सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ती चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते. ती शेअर करत असलेल्या प्रत्येक पोस्टवर तर काही मिनिटांमध्येच लाईक आणि कमेंटचा वर्षाव होतो. सध्या प्रियांका हॉलिवूड सीरिज ‘सिटाडेल’च्या (Citadel) चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. चित्रीकरणादरम्यानचे फोटो ती सतत शेअर करत असते. याच सेटवरील एक फोटो प्रियांकाने शेअर केला आहे. आणि तिचा हा फोटो पाहून चाहत्यांनी मात्र चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली.

प्रियांकाने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चित्रीकरणादरम्यानचा फोटो शेअर केला. या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर रक्त लागलेलं दिसत आहे. तसेच ओठ देखील रक्ताने लाल झालेले दिसत आहे. त्याचबरोबरीने प्रियांकाचे डोळे लाल आणि पाणावलेले यामध्ये दिसताहेत. या फोटोकडे पाहता तिचा अपघात तर झाला नाही ना किंवा तिला दुखापत झाली नाही ना असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले.

पण ही दुखापत नव्हे तर चित्रीकरणासाठी तिने केलेला मेकअप होता. “तुमचा आजचा कामाचा दिवस देखील कठीण होता का?” असं तिने फोटो शेअर करताना म्हटलं आहे. प्रियांकाचा हा फोटो पाहून ती एखाद्या एक्शन सीनचं चित्रीकरण करत असणार असंच दिसतंय. प्रियांकाचा हा फोटो पाहून तुला नेमकं काय झालं?, तू ठिक आहे ना? असे अनेक प्रश्न विचारायला नेटकऱ्यांनी सुरुवात केली.

मुलगी मालती रुग्णालयातून जवळपास १०० दिवसांनी घरी परतल्यानंतर प्रियांकाने लगेचच चित्रीकरणाला सुरुवात केली होती. आता ती तिच्या कामामध्ये व्यस्त आहे. आलिया भट्ट आणि कतरिना कैफ यांची मुख्य भूमिका असणाऱ्या हिंदी चित्रपटामध्येही प्रियांका काम करताना दिसेल. त्याचबरोबरीने तिच्या हाती दोन हॉलिवूड चित्रपट देखील आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या