हेमांगी कवीची ‘ती’ पोस्ट चर्चेत
अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमांगी कवी धुमाळ हे नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. हेमांगी अनेकदा सोशल मीडियावर तिचे मत बिनधास्तपणे मांडताना दिसते. हेमांगी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. ती नेहमी तिचे अनेक फोटो आणि धमाल व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसते. नुकतंच हेमांगीने तिच्या नवऱ्यासंबंधी लग्नानंतर तिच्या खाण्यात कशाप्रकारे बदल झाला, याबाबतची पोस्ट शेअर केली आहे.
हेमांगी कवीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. हेमांगी कवीने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यावेळी तिने कोळी वेशभूषा केली आहे. यात ती खूपच सुंदर दिसत आहे. त्यासोबत तिने एक हटके पोस्ट केली आहे.
हेमांगी कवीची इन्स्टाग्राम पोस्ट
“ही पोळी साजूक तुपातली हिला म्हावऱ्याचा लागलाय नाद!
लग्नाच्या आधी मी फार कमी, कमी म्हणजे नाहीतच जमा, मांसाहार करायचे, मधली ६ वर्ष तर मी अंड सुद्धा खाल्लं नव्हतं. इतकी होते. पण मग पुढे लग्न झालं कोकणातल्या माणसासोबत आणि मग काय हळू हळू मांसाहार वाढत गेला. तेव्हावरील ओळी चपखल आपल्यासाठीच लिहिल्या आहेत असं वाटतं! असं कोण कोण झालंय सांगा पाहू? बरं ते जाऊदे… आज कालवणास काय केलंय ते सांगा!”, असे तिने म्हटले आहे.
हेमांगीच्या या पोस्टवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. यातील अनेकांनी आपल्या खाण्याच्या आवडीबद्दल सांगितलं आहे. हेमांगी कवीची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. तिच्या या पोस्टवर अनेक लाईक्स आणि कमेंट पाहायला मिळत आहे.
हेमांगी कवी ही सध्या ‘कलर्स मराठी’वरील ‘लेक माझी दुर्गा’ या मालिकेच्या मुख्य भूमिकेत झळकत आहे. तिच्यासोबत सुशील इनामदारही मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. ‘लेक माझी दुर्गा’ ही मालिका एका हिंदी मालिकेचा रिमेक असल्याचे सांगितले जाते.
0 टिप्पण्या