मनोरंजन क्षेत्रातील सर्व घडामोडी एकाच क्लिकवर


दिग्दर्शक करण जोहरने ‘जुग जुग जियो’ चित्रपटासाठी गाणं चोरी केल्याचा आरोप पाकिस्तानी गायकाने केला. त्यावर टी-सीरिजने प्रत्युत्तर दिलं आहे. तर दुसरीकडे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेमधील दयाबेन म्हणजेच दिशा वकानी पुन्हा छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. दाक्षिणात्य कलाकार समांथा आणि विजय देवरकोंडाला चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मनोरंजन क्षेत्रातील अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही इथे एका क्लिकवर पाहू शकता.

लक्ष्मीकांत बेर्डे- माधुरी यांच्यातील २८ वर्षांपूर्वीचं बॉन्डिंग पाहून चाहते भावुक

माधुरी दीक्षित आणि सलमान खान यांच्या मुख्य भूमिका असलेला चित्रपट ‘हम आपके हैं कौन’ २८ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्यावेळी हा चित्रपट बराच हिट ठरला होता. सुरज बडजात्या यांचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांच्या व्यक्तिरिक्त मराठमोळा अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती. सध्या सोशल मीडियावर माधुरी दीक्षित आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चाहते भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

करण जोहरवर केलेले आरोप खोटे, टी-सीरिजनेच पाकिस्तानी गायकाची केली बोलती बंद

दिग्दर्शक करण जोहरच्या ‘जुग जुग जियो’ चित्रपटामधील ‘नाच पंजाबन’ हे गाणं एका पाकिस्तानी गाण्याचं कॉपी वर्जन आहे असं म्हणत पाकिस्तानी गायक अबरार उल हकने याबाबत एक ट्विट करत करणवर आरोप केले होते. पण टी-सीरिजनेच आता ट्विट करत या पाकिस्तानी गायकाची बोलती बंद केली आहे.

“तुम्ही तर रिअल हिरो”, क्रांती रेडकरने पती समीर वानखेडेंचा शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

अभिनेत्री क्रांती रेडकर सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तर ती विविध व्हिडीओ शेअर करत असते. क्रांती तसेच तिचे पती अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे नेहमीच चर्चेत असतात. क्रांतीने आता देखील समीर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

समांथा आणि विजय देवरकोंडाला शूटींगदरम्यान गंभीर दुखापत

समांथा आणि विजय देवरकोंडा याच्यासोबत काश्मीरमध्ये ‘कुशी’ या चित्रपटाचे शूटींग करताना दिसत आहे. मात्र या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान अपघात झाला आहे. या अपघातात त्या दोघांनाही गंभीर दुखापत झाल्याचे बोललं जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या