नुकताच औरंगाबाद मध्ये अर्जदार नसताना लायसन्स दिल्याने एका ड्रायव्हिंग स्कूल संचालकावर गुन्हा दाखल झालेली बातमी ताजी असताना, बीड मधील एका बक्शु शेख नामक एजंटाने उमेदवार कामावर असताना त्याला स्वता घरी बसून लायसन्स दिले आहे.
मुळात परिवहन विभागाने ऑनलाइन पद्धतीने शिकाऊ लायसन्स जारी करण्याचा निर्णय जून २०२१ मध्ये घेतला होता. यामागचा प्रमुख उद्देश हा संबंधित अर्जदारास वाहतूक नियमांचे चिन्हांचे ज्ञान होणे, वाहन चालकाच्या जबाबदाऱ्यांचे महत्व व जाणीव असणे आवश्यक आहे . यासाठी केंद्रीय मोटर वाहन नियम ११ अन्वये अर्जदाराने शिकवू अनुज्ञप्ती ची चाचणी स्वता देणे बंधनकारक आहे. परंतु शासनाच्या या धोरणाचा गैरफायदा कित्येक मोटर ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूल सायबर कॅफे व आरटीओ कार्यालयातील दलाल घेत आहेत.
केवळ मोबाईल वरती आधार कार्ड पॅन कार्ड व पैशांचे देवाण-घेवाण करूनच हि लायसन्स झाली होत आहेत. अशी तक्रार शासनाकडे प्राप्त होती. त्या अनुषंगाने शासनाने कारवाई करण्यासंदर्भात महाराष्ट्रातील सर्व आरटीओ अधिकाऱ्यांना आदेशित केले होते.
सदर शासकीय नियमाची अंमलबजावणी होते किंवा कसे याची बीड कार्यालयातून कडक तपासणी होत असून वेगवेगळ्या माहीती देणाऱ्या सुजाण नागरिकांकडून माहिती घेऊन बीड आरटीओ कायदेशीर कारवाई करत आहे. बीड आरटीओ डमी अर्जदारा द्वारे चाचपणी करून बनावट लायसन्स देणाऱ्या वरती कारवाईचा बडगा उगारत आहे. सदर प्रकरणात कोळेकर नामक डमी अर्जदारास बक्क्षु शेख या दलालाने कोणतीही चाचणी न देता स्वतः परीक्षा देऊन लायसन्स दिलेले आहे. त्यांच्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिप व व्हाट्सअप वरील पासवर्ड घेऊन टेस्ट दिल्याचे मेसेज सर्वत्र वायरल झालेले आहेत. त्या अनुषंगाने मोटर वाहन निरीक्षक श्री गणेश विघ्ने यांनी बक्षु शेख यांच्याविरुद्ध भा.दं.वि ४२०,४६४,४६८,४७१ अन्वये शासनाची फसवणूक व बनावट प्रक्रियेने लायसन्स मिळवून दिल्यामुळे बीड ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविला आहे.
"अशा पद्धतीने काम करणाऱ्या ड्रायव्हिंग स्कूल व इतर आस्थापनांची तपासणी होऊन दोषींवर निश्चितच कडक कारवाई केली जाईल" स्वप्नील माने,उप प्रादेशिक परिवहन अधिकारी,बीड
"आरोपी हे एक सुशिक्षित, सामाजिक कार्यकर्ता व विधी पदवीधर असल्याने त्यांचे कडूनच शासकीय नियमांची अशी पायमल्ली होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे" - गणेश विघ्ने, मोटार वाहन निरीक्षक,बीड
0 टिप्पण्या