कोलकाता नाईट रायडर्सला जबर धक्का, दिग्गज गोलंदाज पॅट कमिन्स IPLमधून बाहेर


आयपीएलचा पंधरावा हंगाम आता शेवटाकडे जात असताना कोलकाता नाईट रायडर्स संघाला जबर धक्का बसला आहे. या संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आयपीएलमधून बाहेर पडला आहे. कंबरेला दुखापत झाल्याने आरामाची गरज असल्यामुळे त्याने हा निर्णय घेतलाय. मिळालेल्या माहितीनुसार कमिन्स ऑस्ट्रेलियमध्ये त्याच्या घरी म्हणजेच सिडनीमध्ये परणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्स संघाची प्लेऑफर्यंत पोहोचण्याची शक्यता खूपच कमी आहे. असे असले तरी हा संघ उर्वरित सामने पूर्ण ताकतीनिशी खेळणार आहे. असे असताना दिग्गज गोलंदाज पॅट कमिन्स संघातून बाहेर पडला आहे. काही दिवसांपूर्वी त्याच्या कंबरेला दुखापत झाली होती. याच कारणामुळे आराम करण्यासाठी त्याने हा निर्णय घेतला आहे. आगामी काळात ऑस्ट्रेलियमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यामुळेदेखील कमिन्सला पूर्णपणे तंदुरुस्त होणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याने आता आराम करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, या हंगामात पॅट कमिन्सची कामगिरी तेवढी चांगली राहिलेली नाही. त्याने ५ सामन्यांमध्ये फक्त ७ विकेट्स घेतल्या आहेत. फलंदाजीमध्ये त्याने काही प्रमाणात चांगली कामगिरी केली आहे. मुंबईविरोधातील सामन्यामध्ये त्याने अर्धशतक झळकावून केकेआरला विजय मिळवून दिला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या