कागदावर ‘Y’ अक्षर लिहित खासदार सुजय विखेंनी दिला मुक्ता बर्वेला पाठिंबा, फोटो व्हायरल


अजित सूर्यकांत वाडीकर दिग्दर्शित ‘वाय’ हा चित्रपट येत्या २४ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सध्या सोशल मीडियावर अनेक जण ‘वाय’ अक्षराचे पोस्टर शेअर करत आहेत. अनेक कलाकार, विविध क्षेत्रातील मान्यवर हा फोटो शेअर करताना दिसत आहे. नुकतंच भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनीही सोशल मीडियावर ‘वाय’ या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. त्याद्वारे त्यांनी या चित्रपटाला पाठिंबा दर्शवला आहे.

भाजप खासदार सुजय विखे पाटील हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर इंग्रजीतील Y अक्षर लिहिलेला एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी त्यांचा पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे अनेकांना ‘वाय’ नक्की आहे तरी काय याची उत्कंठा लागून राहिली आहे.

फक्त सुजय विखे पाटील नव्हे तर सिनेसृष्टीतील कलाकार, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हा फोटो शेअर करताना दिसत आहे. त्यासोबत त्यांनी माझा पाठिंबा आहे ! आपला? असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला सर्वसामान्यांनीही पोस्टर शेअर करत सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अभिनेत्री मुक्ता बर्वे ही सध्या वाय या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. सत्य घटनांवर आधारित असलेल्या ‘वाय’ या चित्रपटात मुक्ता ही मुख्य भूमिकेत झळकणार आहे. मुक्ता बर्वे हिची प्रमुख भूमिका असलेला, कंट्रोल एन प्रॅाडक्शन निर्मित वास्तवाचा थरार दाखवणारा आणि कल्पनेच्या पलीकडील ‘ती’ च्या लढ्याची गोष्ट सांगणारा ‘वाय’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

येत्या २४ जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘वाय’ या चित्रपटाची निर्मिती कन्ट्रोल-एन प्रॉडक्शनने केली आहे. अजित सूर्यकांत वाडीकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या