पोलिसांची तात्काळ मदत मिळण्यासाठी राज्यात 112 उपलब्ध

 

अधिक जाणून घ्या



आपत्कालीन परिस्थितीमध्ये पोलीसांची तत्काळ मदत मिळावी म्हणून महाराष्ट्र राज्यात '112' टोल फ्री हेल्पलाइन सेवा उपलब्ध 


आपत्कालीन परिस्थितीमध्ये पोलीसांची तत्काळ मदत मिळावी म्हणून महाराष्ट्र राज्यात '112' टोल फ्री हेल्पलाइन सेवा उपलब्ध करण्यात आली आहे, यासाठी निर्माण केलेल्या पोलिस आयुक्तालयातील पोलिस नियंत्रण कक्षाचे म्हणजेच कंट्रोल रूमचे उदघाटन पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले.

नागरिकांना तात्काळ मदत मिळण्यासाठी पोलीस विभागाच्या 157 वाहनांवर एमडीटी यंत्रणा बसवली आहे. तसेच, पुणे पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाचे नूतनीकरण देखील करण्यात आले आहे. आता नागरिकांच्या तक्रारींची दखल तातडीने घेण्यासाठी पुणे पोलीस विभाग सज्ज आहे. असे अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.


सध्या सोशल मीडियावर अमेरिकेच्या 911 या हेल्पलाईन नबंरचे व्हिडीओ अनेकदा पाहायला मिळतात. अशीच सुविधा '112' या आपत्कालीन नंबरद्वारे मिळणार आहे. इमरजेंसी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टम अंतर्गत सुरु करण्यात येणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या