देव तारी त्याला कोण मारी! भरधाव टँकर दिंडीत घुसला तरी 15 महिला वारकरी वाचल्या


बीड
  : देव तारी त्याला कोण मारी, अशी प्रचिती आज बीडमध्ये  आली. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर  बीडच्या पाली गावात कंटेनरने दिंडीमधील पाण्याच्या टँकरला धडक दिली. शेकडो भाविक भक्त रस्त्याच्या कडेला जेवणासाठी थांबले होते. मात्र, अपघात झाल्याने अचानक एकच गोंधळ उडाला. मात्र, सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली.

या घटनेत टँकरचालक जखमी झाला आहे. तर 10 ते 15 महिला भाविक टँकर शेजारी बसल्या होत्या. मात्र, पांडुरंगाची कृपा म्हणून आम्ही सुखरुप वाचलो, अशी भावना वारकरी भाविकांनी व्यक्त केली. त्यानंतर काही काळ सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. कंटेनरचा ड्रायव्हर दारू पिऊन गाडी चालवत होता. त्यामुळे हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यामुळे कंटेनर चालकाला वारकऱ्यांनी चांगला चोप दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या