16 सीईटी परीक्षांसाठी तब्बल 11 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी





पदवी, पदव्युत्तर पदवी शिक्षणासाठी घेण्यात येणार्‍या 16 सीईटी परीक्षांसाठी तब्बल 11 लाख 63 हजार 270 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना अर्जामध्ये सुधारणा करण्याची एक संधी विशेष बाब म्हणून दिली आहे.

विद्यार्थ्यांना 30 जूनपर्यंत स्वत:च्या लॉगिनमधून अर्जामध्ये सुधारणा करता येणार आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता एमएचटी सीईटी परीक्षेसाठी विविध पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. सीईटी सेलमार्फत आता केवळ बी. एड. (जनरल आणि स्पेशल) आणि एम. पी. एड. सीईटीसाठी अर्जनोंदणी अद्यापही सुरू आहे.


सीईटी 2022 या सामाईक प्रवेश परीक्षेसाठी 6 लाख 6 हजार 142 उमेदवारांनी नोंदणी प्रक्रिया परीक्षा शुल्क भरून पूर्ण केलेली आहे.
काही उमेदवारांकडून अर्ज भरताना अनावधानाने विविध प्रकारच्या चुका झाल्या आहेत. या चुका दुरुस्त करण्याबाबत विद्यार्थ्यांनी सीईटी सेलकडे दूरध्वनी, ई-मेलद्वारे व प्रत्यक्ष कार्यालयात भेट देऊन विनंती केली होती. याची दखल घेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून त्यांनी ऑनलाइन पद्धतीने भरलेल्या अर्जात बदल करण्यासाठी एक विशेष बाब म्हणून संधी देण्याचा निर्णय सीईटी सेलकडून घेण्यात आला आहे, अशी माहिती माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त रवींद्र जगताप यांनी दिली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या