पेपर फुटी प्रकरणी 2 आरोपींना जामीन

 


राज्य आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्य विभागातील गट ड या संवर्गातील पदाच्या भरतीसाठी लेखी परीक्षा घेतली होती.

या परीक्षेचे पेपर फोडून त्याची माहिती समाजमाध्यमांमध्ये प्रसारीत केली होती. या प्रकरणाचा तपास पुणे सायबर पोलिसांनी  करुन आरोपींना अटक  केली आहे. अटक करण्यात आलेल्या उद्धव प्रल्हाद नागरगोजे व राजेंद्र पांडुरंग सानप  यांना पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. ए. पत्रावळे  यांनी 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर  केला आहे.

काय आहे प्रकरण ?
आरोग्य विभाग गट – ड या परीक्षेचा पेपर फुटल्याची तक्रार अनेकांनी फोन करुन पुणे सायबर पोलीस ठाण्यात  दिली होती. सायबर पोलिसांनी याची सखोल चौकशी करुन 20 जणांना ताब्यात घेतले व त्यांच्याविरुद्ध आयपीसी 420, 406, 409, 120 B, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला. आरोपी उद्धव नागरगोजे (वय – 36) व राजेंद्र सानप (वय – 51) यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डोलारे यांच्या कोर्टात जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज करण्यात आला.


न्यायालयाने आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद मान्य करून आरोपींची प्रत्येकी 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. या प्रकरणातील आरोपींच्या वतीने अ‍ॅड. सचिन झालटे – पाटील , अ‍ॅड. तेजेवंती कपले  व अ‍ॅड. पवनराजे डोईफोडे  यांनी काम पाहिले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या