मुंबईमध्ये 2 हजार सीआरपीएफ जवान दाखल
मुंबई -
महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या सत्ता संघर्षामध्ये आज गुरुवार दिनांक 30 रोजी महाविकास आघाडीला बहुमत चाचणीचे निर्देश राज्यपालांनी दिले आहे. शिवसेनेतून बंडखोरी करून एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर मुंबईत परत येणार आहेत. त्यावेळी राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून मुंबईमध्ये 2 हजार सीआरपीएफ जवान दाखल झाले आहेत. दिल्ली, पुणे, गुजरात, महाराष्ट्रातील इतर ठिकाणाहून सीआरपीएफचे युनिट मुंबईत बोलावले गेले. तीन विशेष विमानाने दोन हजर सीआरपीएफचे जवान मुंबईत दाखल झाले आहे. ज्याप्रकारे शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना विरोध दाखवला जात असल्याने ती केंद्र सरकारने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या आधी केंद्र सरकारने सर्व आमदारांच्या घराबाहेर सीआरपीएफ जवान तैनात केले होते.
मुंबईमध्ये 2 हजार सीआरपीएफ जवान दाखल
Reviewed by Rashtra Sahyadri
on
June 30, 2022
Rating: 5
.jpeg)
No comments