पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी 52 मिनिटाची सीडी!

 

बंडखोरीमुळे संजय राठोड यांचा गुन्हा सिद्ध होणार?



यवतमाळ :  

माजी वनमंत्री संजय राठोड यांच्याविरोधात पूजा चव्हाण प्रकरणातील पुरावे सादर करण्याची धमकी शिवसैनिकांनी दिली आहे. पूजा चव्हाण ला संजय राठोड यांनी मारल्याची 52 मिनिटाची सीडी आपल्याकडे असल्याचा दावा शिवसैनिकांनी केला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे संजय राठोड यांना मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. शिवसैनिकांच्या धमकीनंतर बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात दाखल झालेले संजय राठोड हे लवकरच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत घरवापसी करण्याची शक्यता आहे.


 एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले आणि संजय राठोड गुवाहाटीमध्ये दाखल झाले. त्यामुळे आजपर्यंत संजय राठोड यांचं समर्थन करणारे शिवसैनिक कमालीचे संतापले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शिवसेना आमदार संजय राठोड यांनी शिवसेनेशी गद्दारी केल्याने त्यांचे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातले पुरावे समोर आणू, या प्रकरणातली 56 मिनिटांची एक सीडी आपल्याकडे असून, बंजारा समाजाची मुलगी त्याने कशी मारली हे त्यातून उघड होईल असा गौप्यस्फोट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी केला आहे.

 पूजा चव्हाण या बंजारा समाजाच्या तरुणीला मारून संजय राठोड यांनी बंजारा समाजाशी बेईमानी केली, पूजा चव्हाण वर त्याने कसे अत्याचार केले हे आम्हाला माहिती असून त्याचा पर्दाफाश करू असेही गायकवाड यांनी जाहीर भाषणात सांगितलं. राठोड विरुद्ध गळा काढणारे भाजप नेते आणि चित्रा वाघ आता त्यांच्या मांडीला मांडी लाऊन कसे बसणार? असा सवालही गायकवाड यांनी केला. संजय राठोड यांनी गुवाहाटीतून मातोश्रीवर यावे आणि माफी मागावी अन्यथा त्यांना जिल्ह्यात फिरु देणार नाही, असा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या